कपाशीवर करपा रोगांमुळे उत्पन्नात घट शेतकरी चिंतेत
तऱ्हाडी,ता.शिरपुर दि. ३०(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे): महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा ला कपाशीवर रोगराईच्या फटका बसत आहे.
तसेच शिरपूर तालुक्यात कपाशीच्या पिकांवर होणारी रोगराई .करपा. लाल पडणे बोंड अळी .कपाशीची वाढ न होणे अशा विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पन्न हे घटनार आहे.
मागच्या काही वर्षाच्या एकरी उत्पन्नापेक्षा निम्म्यावर या वर्षी उत्पन्न निघेल अशी परिस्थिती झाली आहे. तरी कुठल्याही नुकसानीच्या पंचनामा झाला नसून शेतकऱ्यांच्या बाणावर जाऊन पिकांचे झालेले नुकसान बघावे व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कपाशीचे उत्पन्न घटल्याने तरी कपाशीला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकरी करत आहे.