जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी महाविद्यालयात पोस्टर व मॉडेल मेकिंग स्पर्धा संपन्न

 जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी महाविद्यालयात पोस्टर व मॉडेल मेकिंग स्पर्धा संपन्न 


चोपडा दि.३०(प्रतिनिधी):25 सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयाने फार्मसी सप्ताह उत्साहात साजरा केला आणि  विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या साठी पोस्टर व मॉडेल मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले.

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे ध्यक्ष अॅड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, सचिव सौ.डॉ.स्मिताताई संदीप पाटील, संचालक श्री डी. बी देशमुख, प्राचार्य डॉ.गौतम पी वडनेरे उपस्थित होते. 

या स्पर्धेला उदघाटक म्हणून चोपडा तालुका फार्मासिस्ट असोसिएशन चे मान्यवर श्री.दीपक पाटील (अध्यक्ष), श्री.प्रविण मिस्तारी(सेक्रेटरी) रमाकांत सोनवणे (सदस्य) लाभले 

तसेच स्पर्धेचे मूल्यांकना करिता आदरणीय भैय्यासाहेब यांचे शिक्षक  प्रा. अविनाश सोनावणे माजी मुख्याध्यापक (प्रताप विद्या मंदिर विद्यालय चोपडा)  व  प्रा. श्रीयुत एस. टी कुलकर्णी (प्रताप विद्या मंदिर विद्यालय चोपडा) यांच्या तज्ञ व दीर्घ अनुभवा मुळे ज्या प्रतीचे मूल्यांकन केले ते आमच्या विदयार्थ्यांनचा उत्साह वाढवाणारे ठरले. तसेच 

श्री.प्रविण मिस्तारी  (सेक्रेटरी, चोपडा तालुका फार्मासिस्ट अससोसिएशन ) सरांनी फार्मासिस्ट हा समाज आणि डॉक्टर्स ह्यामधील दुवा ह्याविषयावर मुलांना मार्गदर्शन केले

तसेच भैय्यासाहेब अॅड संदीप सुरेश पाटील यांनी करोना महामारीच्या काळातील चोपडा तालुक्यातील फार्मासिस्ट बांधवांनीं उल्लेखनीय जवाबदारी चोख पद्धतीने निभावली या साठी त्या सर्वांचे कौतुक व आभार मानले.ह्या स्पर्धे साठी पन्नास पोस्टर व सायंटिफिक मॉडेल प्रदर्शित केले होते, जवळ जवळ शंभर स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदवाला. उत्कृष्ट पोस्टर्स व मॉडेल्स ला ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले 

कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.संदीप पवार यांनी तर प्राचार्य डॉ.जी.पी. वडनेरे यांनी प्रास्ताविक केले व तसेच आभार  प्रदर्शन प्रा. क्रांती पाटील यांनी केलेह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  प्रा.तुषार पाटील व प्रा.पियुष चव्हाण तसेच विभाग प्रमुख , प्रबंधक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने