कुसुंबा गावाला जोडणाऱ्या पुलाजवळील रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांची वाढ.. सबंधित विभागाने तात्काळ दखल घ्यावी गावकऱ्यांची मागणी...
रावेर दि.३०(प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा खुर्द व कुसुंबा बुद्रुक या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाजवळील अरुंद रस्ता ठरतोय अपघातांना कारणीभूत,रस्त्याची तात्काळ दुरुस्ती न केल्यास अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता बांधकाम खात्याच्या अधिकारी व सबंधित लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांचा जाणीव पूर्वक कानाडोळा,सबंधित अधिकारी अपघात होऊन जीवितहानी होण्याची प्रतीक्षेत असल्याचा कुसुंबा गावकऱ्यांमध्ये बोलले जात आहे,या प्रकाराची सबंधित वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन कुसुंबा गावातील रस्ता दुरुस्त करण्याची गावकरी व वाहन धारकांची मागणी आहे,जर तात्काळ रस्ता दुरुस्त न केल्यास या ठिकाणी अपघात घडल्यास सबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार राहणार असे गावकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया दिसत आहे...