शिरपुर नवल नगर बस अखेर पाच वर्षानंतर पूर्ववत सुरू
शिरपूर दि.३० (प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैदाणे) आगाराची बस गेल्या पाच वर्षापासून बंद होती ही बस शिरपूर होऊन नरडाणा बेटावद मुडी मांडळ मार्गे नवल नगर या मार्गावर धावत होती परंतु गेल्या काही वर्षापासून या बसला बंद करण्यात आले होते या बस करिता पृथ्वीराज ठाकूर तसेच डॉक्टर योगराज सूर्यवंशी आणि प्रवासी संघाचे अरविंद हिम्मतराव सूर्यवंशी आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ सैंदाणे तसेच सुनिल चौधरी व ग्रामपंचायत कमिटी मुडी बोदरडे यांनी वारंवार निवेदने आणि प्रत्यक्ष जाऊन शिरपूर आगाराशी संपर्क करून सदर बस सेवा चालू होण्यासंदर्भात विनंती केली या विनंतीला मान देऊन चांगली उत्पन्न देणारी बस सेवा त्वरित सुरू करण्याबाबत पृथ्वीराज ठाकूर तसेच देवरे साहेब त्याचप्रमाणे आगारप्रमुख पावरा मॅडम या सर्वांनी या मागणीचा विचार करून ही बस सेवा त्वरित सुरू होण्याबाबत हालचाली सुरू केल्या आणि आज पाच वर्षे बंद पडलेली बस सेवा पूर्ववत सुरू झाली याकरिता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत गाडीचे वाहक आणि चालक यांचा प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला या बस सेवामुळे विद्यार्थी वर्ग प्रवासी वर्ग आणि बाजारासाठी जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या लाल परीचा सन्मान करून अधिकृत बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज ठाकूर साहेब यांनी केले आहे