गुणांच्या सन्मान करणे म्हणजेच संस्कृतीचे दर्शन होय :अरुणभाई गुजराथी
चोपडा दि.२८(प्रतिनिधी) गुणांची कदर करा गुणांच्या सन्मान करा गुणवाल्यांना पुढे पाठवण्याचे समाजाने काम करावे जो गुणांच्या सन्मान करतो त्यात संस्कृतीचे दर्शन होते असते असे प्रतिपादन माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपीच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते
भारतीय जैन संघटना व आनंद सुपर शॉपी यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंदराज पॅलेस च्या हॉलमध्ये हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रा. शांतीलाल बोथरा ,जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडिया, आनंद सुपर शॉपीचे संचालक व जैन दादावाडीचे संचालक डॉक्टर निर्मल टाटिया,भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.डॉ.सुरेश अलीझाड, पीपल्स कॉ. ऑप बँकेचे संचालक नेमीचंद कोचर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष निर्मल बोरा महिला अध्यक्ष सौ सपना टाटिया आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, शिक्षकाचा सत्कार समाजाने करायलाच हवा.पिढी घडविण्याचे काम हा शिक्षकच करतो. शिकविण्यात जो आनंद आहे. तो आनंद व्होकेशन,राजकारणात,कोणत्याच क्षेत्रात नाही. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा चांगल्यात चांगले शिकवण्याकडे लक्ष द्यायला हवे.असे प्रतिपादन अरुण भाई गुजराथी यांनी केले यावेळी व्यासपीठावरील डॉ निर्मल टाटिया यांनी आपल्या छोट्याखानी मनोगतात सांगितले की गुणांच्या मागे धावू नका जनरल नॉलेज कडे लक्ष दया,समाजात कसे वावरावे कसे बोलावे याकडे लक्ष द्या गुणांचे बौद्रेशन मुलांवर पालकांनीही टाकू नये असे मौलिक विचार डॉक्टर टाटिया यांनी केले.
तसेच प्राध्यापक शांतीलाल बोथरा यांनी आपले विचार मांडताना सांगितले की स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला मेहनत करणे व मेहनत करून सिद्ध करणे याकडे लक्ष द्यावे लागेल आगामी काळात नोकऱ्या मिळतीलच ह्या भरोशावर राहू नका परंतु चांगले शिक्षण असले तर आपण आपल्या हिमतीवर काहीही करू शकतो याच्या भान राहू द्या असे मौलिक विचार प्राध्यापक बोथरा यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंगलाचरण महिला मंडळने केले तदनंतर स्वागतगीत झाले मान्यवरांच्या सत्कार भारतीय जैन संघटनेचे गौरव कोचर,शुभम राखेचा,श्रेणिक रूनवाल,आकाश सांड,अभय ब्रम्हेचा आदी पदाधिकाऱ्यांनी केले प्रास्ताविक दीपक राखेचा यांनी केले. तर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दहा आदर्श शिक्षकांचे ट्रॉफी व शाल देऊन सत्कार करण्यात आले शिक्षकांचा परीचय अर्चना बोरा यांनी करून दीला तर जवळपास 70 गुणवंत मुलांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लतिश जैन, जितेंद्र बोथरा यांच्या वाढिवसानिमित्त त्यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात उपप्राचार्य प्रा डॉ ए एल चौधरी, महावीर पतसंस्था चे माजी संचालक डॉ आर टी जैन,रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष धिरेंन्द्र जैन , व प्रतिष्ठित मान्यवर ,व महीला उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन देशलहरा, चेतन टाटिया, उपाध्यक्ष मयंक बरडीया, दिनेश लोडाया, आनंद आचलिया, प्रवीण राखेचा, शुभम राखेचा, विपुल छाजेड, आदींनी मेहनत घेतली तर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मानसी राखेचा,सौ मिनाक्षी जैन सौ. अर्चना बोरा यांनी केले तर आदेश बरडीया यांनी आभार व्यक्त केले.