बेटावद गावात पुन्हा धाडसी चोरी एकाच रात्री 3 घरे फोडली..पोलिसांसमोर आव्हान..
बेटावद,ता.शिंदखेडा दि.०३(प्रतिनिधी): बेटावद गावी एकाच दिवशी अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन घरे फोडून लाखोंचा ऐवज लुटून नेल्याने परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली असून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,दि 2/9/22 वार शुक्रवार रोजी पहाटे 2 ते 4 वाजेच्यादरम्यान कैलासनगर परिसरातील 3 घरे साहसी रीतीने कुलूप कोंडे तोडून चोरी करण्यात आली.त्यात राजेंद्र विठ्ठल बागुल माजी सैनिक यांच्या प्लॉट नंबर 3 ब यांच्या घरातून नेकलेस 1.75ग्रॅम,कानातले टोंगल 6 ग्रॅम, मंगळसूत्र 4 ग्रॅम, तसेच किरकोळ 4 ग्रॅम सोने व जवळजवळ 1 लक्ष रु.बेडरूम मधील कपाट तोडून डब्यातील सर्व मुद्देमाल चोरी करण्यात आला.
राजेंद्र बागुल हे माजी सैनिक असून सध्या ते नरडाना बाभळे एमआयडीसी मध्ये मॅक्सकॉ कंपनीमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून कामाला रात्र पाळी ने जात असतात. सदर घटना ही रात्री 2 ते 4 वाजेच्या दरम्यान घडली असावी तसेच ह्या वेळेत वीज सुध्दा ये जा करीत होती व पाऊस सुरू होता म्हणून अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचे धाडस होत असावे.
तसेच दिलीप जयवंतराव पवार सेवानिवृत्त शिपाई प्लॉट नंबर 2 ब यांच्या घरात कडी कोंडा तोडून जोरात शिरले संपूर्ण घरातील सामानाची नासधूस केली सर्वसामान अस्तव्यस्त फेकून दिलेला आढळला. हा परिवार गेला दीड ते दोन महिन्यापासून पुणे येथे आपल्या मुलांकडे गेलेला होता व बंद घराला पाहूनच चोरीचे धाडस झालेले असावे सदर घरातील महिला गावाला जाताना आपल्या घरातील तीन ग्राम सोने हे समोरील राजेंद्र बागुल यांच्या घरी देऊन गेलेला होत्या परंतु नशिबाची थट्टा बघता तेथेही चोरी झाली यामुळे संपूर्ण दोन्ही परिवार हतबल बसलेली दिसतात
या सर्व धाडसी चोऱ्यांमुळे बेटावद गावात व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे रात्रीची गस्त वाढावी तसेच पोलिसांनी याकडे जरा जातीने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांमधून जोर धरून होती पुन्हा पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन चोरांनी चोरी केली मात्र आता पुढे काय होते चोर सापडतात की गायब होतात हे पाहणे औचित्याचे असेल सदर चोरीची नोंद पोलीस स्टेशन मध्ये करण्याचे काम सुरू आहे
