कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी कबचौ यांच्या शुभहस्ते बी. फार्मसी महाविद्यालय वार्षिक वर्षग्रंथ-2022 चे प्रकाशन

 कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी कबचौ यांच्या शुभहस्ते बी. फार्मसी महाविद्यालय वार्षिक वर्षग्रंथ-2022 चे प्रकाशन   

चोपडा दि.२६(प्रतिनिधी)  महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित चोपडा येथील एनबीए मानांकन प्राप्त श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील फार्मसी महाविद्यालयात वर्षग्रंथ -2022 या वार्षिक मासिकाचे  प्रकाशन माननीय कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या हस्ते दिनांक 24 सप्टेंबर 2022 या रोजी   करण्यात आले. सदरहू कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष माननीय अँड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील, प्रा.भाऊसाहेब डि.बी. देशमुख उपस्थित होते. सर्वप्रथम प्राचार्य डॉ. जी. पी. वडनेरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.  कुलगुरूंचे महाविद्यालयामध्ये आगमन झाले हा एक सुवर्णयोग जुळून आला आहे. आम्ही परीक्षार्थी आहोत, महाविद्यालयात आपल्या येण्याने महाविद्यालयाचा व आम्हा सर्वांचा भाग्योदय झाला असे मनोगत प्राचार्य डॉ. जी. पी. वडनेरे यांनी कार्यक्रमाच्या  प्रस्तावनेत   व्यक्त केले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कुलगुरूंनी विद्यार्थांना उद्योजकीय क्षेत्रातील विविध वाटा शोधण्यासाठी प्रेरित केले. ते म्हणाले "नोकरी देणारे होण्यासाठी प्रयत्न करा नोकरी शोधणारे होण्याऐवजी" तसेच त्यांनी 

वर्षग्रंथ मध्ये समाविष्ट असलेल्या विविध विषयांवरील लेख, कविता तसेच नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ संकल्पना याचे मनस्वी कौतुक माननीय कुलगुरु यांनी प्रकाशनावेळी केले. महाविद्यालयाच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. कुलगुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व धैर्य वाढणार असे मनोगत संस्थेचे अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. वर्षग्रंथ च्या संपादिका डॉ. सुवर्णलता महाजन व संपादकीय विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम तसेच विद्यार्थ्यांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद या सगळ्याच तसेच वर्षग्रंथ प्रकाशनाची परंपरा निरंतरपणे जोपासल्या बद्दल अँड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील यांनी संपादकीय सदस्य, विद्यार्थी व प्राचार्य  यांचे अभिनंदन केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. क्रांती पाटील व आभार प्रदर्शन डॉ. संदीप पवार यांनी केले. सदरहू कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता संदिप पाटील व प्राचार्य यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली सर्व विभाग प्रमुख, प्रबंधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने