*गुर्जर समाज गरजवंताच्या हाकेला साद घालणार.उद्योजक महेंद्र जाधव यांचे आश्वासन..आळंदीत समाजाचा वार्षिक मेळावा उत्साहात
पुणे दि.२१(प्रतिनिधी): गुर्जर समाज हा अत्यल्प व बोटावर मोजता येण्या जोगा समाज असून सर्वत्र विखुरलेला आहे त्यात गरिबी कंंठणारे बरेच व्यक्ती आहेत त्यांच्या कल्याणार्थ आपण सदैव दोन हात पुढे करून मदतीसाठी सज्ज आहोत.ऐव्हढेच नाही तर बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची कुबडी बनून आधार देईल त्यासाठी कोणीही बिचकुन न जाता हाक द्यावी.मी आपल्यासाठी सज्ज आहे असे जाहीर प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महेंद्र जाधव यांनी आयोजित गुर्जर समाज वार्षिक मेळाव्यात केले.
ते पुढे म्हणाले की, गरिबी हा कोणत्याही समाजाला मिळालेला अभिशाप नसून आपल्या कर्तृत्वाची कमतरता आहे मनगटाच्या जोरावर माणसाला जग जिंकता येते त्यासाठी हवी असते ती जिद्द.. तिच्या चिकाटी वर तुम्ही आकाश ठेंगणे करु शकाल.. अशा जिद्दी व्यक्तीने गरज असल्यास माझ्याकडे यावे मी नक्की मदत करेल असे आश्वासन त्यांनी समाज बांधवांना दिले.
गुर्जर समाज सेवा मंडळ आळंदी (पुणे) यांच्या वतीने काल दिनांक 21/8/2022 वार्षिक मेळावा आळंदी येथे संपन्न झाला त्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान श्री. गोपालजी चौधरी( जिल्हा परिषद सदस्य जळगांव) यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. महेंद्र शंकरराव जाधव आणि श्री. एम. सी.पाटील यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी आजी व माजी अध्यक्ष उपस्थित होते. तसेच कार्यकारी मंडळ यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पुणे नगरीत स्थित सर्व गुर्जर समाज बांधवांनीही खास हजेरी लाभली.