आमदार मंगेश चव्हाण यांना कोळी समाज बांधवांचे निवेदन

 आमदार मंगेश चव्हाण यांना कोळी समाज बांधवांचे निवेदन


 चाळीसगाव दि.२२( प्रतिनिधी):  तालुक्याचे तरुण तडफदार आमदार मंगेश दादा चव्हाण यांना चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील कोळी समाज बांधवांनी जातीच्या दाखल्या बाबत निवेदन दिले.गेल्या अनेक वर्षा पासून चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी समाज बांधव राहतात पण त्यांना अनुसूचित जमाती एस टी चा दाखला मिळत नाही त्याबाबत पावसाळी अधिवेशनात आपण कोळी समाज बांधवाचा जातीच्या दाखल्याचा प्रश्न मांडावा व कोळी समाजाला न्याय मिळवून द्यावा अश्या आशयाचे निवेदन कोळी समाज बांधवांतर्फे आमदार साहेबांना देण्यात आले,तसेच जातीचा दाखला काढण्यासाठीजाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली नक्कीच आपला प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उपस्थित कोळी समाज बांधवांना दिले.त्यावेळी आमदार साहेबांचे खंदे समर्थक तुषार सूर्यवंशी बोरखेडा, नगरसेवक चंदू तायडे चाळीसगाव,सुरेश आमले वडाळा,तसेच कोळी समाजाचे अनुसूचित जमातीचे दाखले काढण्यासाठी अनेक वर्षापासून पुरावे जमा करणारे रघुनाथ तुकाराम कोळी चाळीसगाव यांच्यासह दीपक कोळी जामदा,किशोर शेवरे वडाळा,सुभाष कोळी बहाळ,मनोज कोळी रहिपुरी,दीपक चव्हाण खेडगाव,कांतीलाल मोरे बहाळ, इत्यादी कोळी समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने