जळोदअनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत सत्कार व भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

 जळोदअनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत सत्कार व भव्य उद्घाटन सोहळा संपन्न


 तऱ्हाडी,ता.शिरपुरदि.२२(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे ):   जळोद अनुदानित आश्रम शाळा शिरपूर जिल्हा धुळे या शाळेत सत्कार व भव्य उद्घाटन सोहळा   तृप्ती धोडमिसे (मा.प्र.से.) प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.  स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर संस्थेचे अध्यक्ष श्री. . अशोकजी आधार पाटील यांच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण, डिजिटल वर्ग, वॉटर फिल्टर, वॉटर हीटर, भोजन हॉल व अत्याधुनिक रोटी मेकर मशीन इत्यादींचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी जळोद पंचक्रोशीतील, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक, माता पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 उद्घाटन सोहळ्यानंतर संस्थेचे सचिव . योगिता अशोक पाटील यांच्या हस्ते प्रकल्प अधिकारी मॅडम  तृप्ती धोडमिसे यांच्या सत्कार करण्यात आला. प्रकल्प व प्रांताधिकारी या दोन्ही कार्यालयाला आय एस ओ नामांकन मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरीचे शिल्पकार  तृप्ती धोडमिसे मॅडम यांना संस्थेचे अध्यक्ष . श्री अशोकजी आधार पाटील यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेची मूर्ती , सन्मानपत्र देऊन मॅडमांचा सन्मान करण्यात आला. शालेय परिसर, विद्यार्थी संख्या, आश्रमशाळेतील सोयीसुविधा बघून प्रकल्प अधिकारी मॅडम भारावून गेले.  मॅडमांंनी संस्थाचालक व शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतुक करून आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याविषयी मार्गदर्शन केले. संस्थाचालकांनी देखील शाळेला सर्वतोपरी आवश्यक सर्व गरजा पूर्ण करू, विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा व पुढील शैक्षणिक वर्षापासून अकरावी व बारावी फक्त मुलींसाठी कला व विज्ञान शाखेचे वर्ग सुरू करण्याचे मानस व्यक्त केले.

 सदरकार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजनाड शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोहर पाटील सरांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळोद आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक श्री.एस के पाडवी सर यांनी केले, कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन श्री. बी सी सोनवणे सर यांनी केले.

  कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी श्री रवींद्र शेलार सर तसेच प्राथमिक मुख्याध्यापक पी एन मराठे सर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री एस एस जमादार सर व,सर्व कर्मचारी वृंदांनी मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने