गणपूर येथे गोकुळ अष्टमीची धूम,पाच हजार भक्तांनी घेतले दर्शन

 गणपूर येथे गोकुळ अष्टमीची धूम,पाच हजार भक्तांनी घेतले दर्शन     

  

गणपूर(ता चोपडा)ता21: येथे दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी चा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सुमारे पाच हजार नागरिकांनी कृष्णजन्म सोहळ्याचे दर्शन घेतले.                      जन्माष्टमी निमित्त गावात सर्वत्र रोषणाई करण्यात आली होती.बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक रित्या जन्माष्टमी साजरी करण्यात आली.चौकाचौकात महानुभाव पंथीयांनी विशेष व कृष्ण पाळण्याची मांडणी करण्यात आली होती.सायंकाळ ते रात्री बारापर्यंत हा सोहळा पार पडतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने