चोपडा ते सुटकार बस सुरू करा.. विद्यार्थ्यांची गैरसोय था़ंबवा ग्रामस्थांची मागणी

 चोपडा ते सुटकार  बस  सुरू करा.. विद्यार्थ्यांची गैरसोय था़ंबवा ग्रामस्थांची मागणी


अडावद,ता.चोपडा दि.२८( प्रतिनिधी ,मन्‍सुर तडवी  ) चोपडा तालुक्यातील सुटकार हे गाव सुमारे  2200 ते 2500  लोकसंख्या असलेले गाव असून या गावात अडावद हून एसटी बस  सुरू होती परंतु गेल्या पंधरा दिवसापासून अचानक एसटी बस  सेवा बंद पडल्याने शाळकरी विद्यार्थींचे प्रचंड गैरसोय निर्माण होत आहे तरी बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी जोरदार मागणी होत आहे.


 या गावातून रोज 150 ते 200 शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी हे अडावद ते चोपडा असा प्रवास करतात परंतु गेल्या पंधरा दिवसापासून एसटी बस  सेवा बंद असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे तसेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यास एक वर्ष देखील झालेले नसून मोठ मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे तरी  प्रशासनाने    सुटकार ह्या गावावर लक्ष्य देऊन रस्ता दुरुस्त करून एस टी बस सुरु करावी   तसेच रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे त्यामुळे बस बंद पडली असून प्रशासनाने आमच्या सुटकार ह्या गावाकडे लक्ष देऊन रस्त्या तील खड्ड्यांची दुरुस्ती करून  गावात पुन्हा एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी  आणि ग्रामस्थांकडून  होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने