मयतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान द्या..! निळे निशाण संघटनेची तहसीलदारांकडे मागणी

 मयतांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान द्या..! निळे निशाण संघटनेची तहसीलदारांकडे मागणी


चोपडा दि.२८(प्रतिनिधी) १२ ऑगस्ट -2022 रोजी मयत झालेला राकेश राजपूत याच्या कुटुंबीयांना शासनाकडून सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी चोपडा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे निळे निशाण संघटनेमार्फत करण्यात आली आहे

निवेदनात म्हटले आहे की दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी चोपड़ा शहरात प्रेम प्रकरणातून राकेश राजपूत पाच निर्घुण हत्या झालेली असून, आज रोजी   त्यांच्या  परिवारात त्याची आई आणि एक लहान बहिण असून त्यांना कुठलाही आधार नाही.   तसेच त्याचे वडील पूर्ण पणे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे  ते त्यांच्या  पत्नी सोबत न राहता इतर ठिकाणी वास्तव्य करतात. त्यामुळे राकेशच्या आई आणि बहिणीचे आयुष्य कसे व्यतीत होईल एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . राकेश हा त्याच्या आईचा आणि बहिणीचा एकमेव आधार असताना  आई आणि बहीण पूर्ण निराधार झालेले आहे. तरी या सर्व बाबीचा शासनाने विचार करून त्याना तात्काळ आर्थिक द्यावी, जेणेकरून त्यांना  संकटांना समोर न जाता त्याच्यावर उपासमारीची वेळ येणार  नाही.  शासनाने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी विनंती निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने