पत्रकारांच्या विविध समस्या सोडवाव्यात अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा पत्रकार सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्धार
रायगड दि.२५ (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीची कर्जत येथील शासकीय विश्रामग्रह येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना होते
या बैठकीत*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,राज्यातील पत्रकारांसाठी घरकुल व विमा योजना,*यादीवर नसलेल्या वृत्तपत्राना शासकीय जाहिराती,राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता,राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,*कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय मदत,अधिस्वीकृती च्या जाचक अटी रद्द करणे,इत्यादी विषयावर चर्चा करून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक आंदोलने करण्याचा निर्धार करण्यात आला,पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार*आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारात धूळ खात पडत असून राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे कर्जत तालुका अध्यक्ष बाळा गुरव यांनी सांगितले
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार वसंत कोळंबे नरेश पाटील अनिल गवळे जयेश जाधव योगेश सदावर्ते इत्यादी पत्रकार उपस्थित होते