छत्रपती शिवाजी महाराज उल्हासनगर प्रवेशद्वारा समोर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारा मराठा सेवा संघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश देसले यांची मागणी

 छत्रपती शिवाजी महाराज उल्हासनगर प्रवेशद्वारा समोर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारा मराठा सेवा संघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश देसले यांची मागणी


उल्हासनगर दि.२५(प्रतिनिधी ): उल्हासनगर कैंप ३ येथिल शांतीनगर येथे कल्याण अंबरनाथ रोडवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार उल्हासनगर महापालिकेने बांधले असुन चांगले सुशोभित केले आहे. मात्र या प्रवेशद्वारा जवळ शिवाजी महाराज यांचा पुतळा नाही. तेव्हा या प्रवेशाद्वारा जवळ संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जगदिश देसले, जिल्हा संघटक विशाल कुरकुटे व महेंद्र उबाळे यानी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना दिलेल्या निवेदनात केली आहे. उल्हासनगर महापालिकेने कल्याण अंबरनाथ रोडवर शांतीनगर या ठिकाणी प्रवेशद्वार बांधले असुन या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी

महाराज यांचे नाव दिले आहे. तेव्हा या प्रवेशद्वाराजवळ संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा म्हणुन मराठा सेवा संघ पुढे आला असुन संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जगदिश देसले, विशाल कुरकुटे व महेंद्र उबाळे यानी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची भेट घेवुन सदर प्रवेशद्वारा जवळ संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्या बाबत निवेदन सादर केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने