*शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची नुतन कार्यकारिणी जाहीर-- तालुकाध्यक्ष नरेंद्र भामरे तर कार्यवाह राहुल पवार यांची निवड*
शिंदखेडा दि.२५ (प्रतिनिधी ) -- येथील जनता हायस्कूल येथे आज शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या द्विवार्षिक निवडणूक घेण्यासाठी सर्वसाधारण सभा राज्य संघाचे सहकार्यवाह संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर शिंदखेडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले त्यानुसार पुढील दोन वर्षांसाठी शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी नरेंद्र अरुण भामरे (झोटवाडे) तर कार्यवाह राहुल घनश्याम पवार( बेटावद )यांची निवड बिनविरोध करण्यात आली.उर्वरीत कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष आर.बी.पाटील,(दराणे रोहाणे ) व छाया पवार (होळ ),कोषाध्यक्ष अतुल पाटील (जनता हायस्कूल शिंदखेडा), सहकार्यवाह कुंदन पाटील (नुतन हायस्कूल दोंडाईचा) जोस्ना प्रभाकर सिसोदे (बाम्हणे) तर सदस्य म्हणून संदीप नारायण पाटील (गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा) नितीन भिला पाटील (धांदरणे) सुधाकर निंबा पाटील ( झोटवाडे) मनीष कचवे (कर्ले ) संदीप बडगुजर (तावखेडा) योगेश सुभाष बच्छाव (सवाई मुकटी.) योगेश लक्ष्मण पाटील( दोंडाईचा) सुनील सैदाणे (विखुर्ले )तुषार शिवाजी पाटील (वारूड) नितीन मुरलीधर पाटील (विरदेल.) प्रवीण रघुनाथ पाटील( चिमठाणे ) प्रशांत रमेश पाटील( रंजाने) विजय जाधव (स्वामी समर्थ हायस्कूल शिंदखेडा) उज्वल प्रभाकर पवार (वायपूर )मीना जगन्नाथ पाटील (नूतन हायस्कूल दोंडाईचा) पदसिद्ध हेमंत ठाकरे (होळ) यांची निवड बिनविरोध करण्यात आली. ह्या निवडणूक कामी राज्य सहकार्यवाह संजय पवार यांच्या देखरेखीखाली कामकाज झाले. सदर निवडीबद्दल ज्येष्ठ शिक्षक संघाचे नेते वि.मा.भामरे, व्ही.यु.कुंवर, निशांत रंधे,एस.कै.चौधरी ,एस.एम.पाटील,व्ही.एन.पगार,एस.व्ही.नांद्रे, सुनील पवार,आर.डी.सिसोदे, हेमंत ठाकरे, माजी तालुकाध्यक्ष यादवराव सावंत, के.टी.बच्छाव,बी.व्ही.अहिरे यांच्या सह तालुक्यातील शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षकांनी वरील नुतन कार्यकारिणी चे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.