नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने श्री. संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी
*भडगाव दि.२५ (प्रतानिधी)-* येथिल नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने श्री. संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री. विठ्ठल रुख्मिणी, संत सेना महाराज समाज मंदीरात मंडळाचे अध्यक्ष संजय पवार याच्या हस्ते विधीवत पुजा करुन स्थापना करण्यात आली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी शहरातील प्रमुख मार्गाने सवाद्य श्री. संत सेना महाराज यांच्या पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालाखी मिरवणुक दरम्यान माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, पिपल्स बॕकेचे चेअरमन दत्तात्रय पवार, माजी नगरसेविका योजना पाटील, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय भोसले, समाजसेवक निलेश मालपुरे, उदय देशमुख, चर्मकार संघाचे रविद्र अहिरे, देवा अहिरे, डी. डी. पाटील, जेष्ठ पत्रकार शिवदास महाजन, विनायक देशमुख, शिवाजी नरवाडे यांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगरसेवक डाॕ. विजयकुमार देशमुख व युवा नेतृत्व सौरभ देशमुख यांनी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार याचा सत्कार केला. दरम्यान श्री. संत सेना महाराज मंदीरात महाआरती प्रसंगी कै. आर. ओ. पाटील यांच्या कन्या तथा निर्मल सिडस् संचालिका वैशालीताई सुर्यवंशी यांनी भेट देऊन महाआरतीचा लाभ घेतला. या प्रंसगी त्यांनी मंडळाचे पदाधिकारीचा शाल, बुके देऊन सत्कार केला. यावेळी त्याच्या सोबत शिवसेना शहरप्रमुख शंकर मारवाडी, प्रशांत गालफाडे, माधव जगताप, दिपक पाटील आदि उपस्थित होते. नाभिक समाज जिल्हाध्यक्ष रविद्र नेरपगारे, सहकार्यध्यक्ष कीशोर वाघ, खोंडे ज्वेलर्सचे संचालक आप्पासाहेब खोंडे, बाराबलुतेदारचे जिल्हाध्यक्ष कीशोर सुर्यवंशी, जेष्ठ पत्रकार मोहन साळवी, महिलाध्यक्ष संगिताताई गवळी, सौ. खोंडे मॕडम, अलका सोनवणे, राजकुमार गवळी, संजय सोनवणे, रविंद्र बोरनारे, नारायण सोनवणे सह जिल्हास्तरा वरील मान्यवरानी भेट देऊन दर्शन घेतले. महाप्रसाद वाटप होवुन सांगता कार्यक्रमाची सांगता झाली. पुण्यतिथी कार्यक्रम निमित्ताने सर्व समाज बांधवानी आपली व्यवसायिक दुकाने बंद ठेवली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार), उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अॕड. भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, सुभाष ठाकरे, सुर्यभान वाघ, भगवान नेरपगार, कीशोर निकम, संपर्क प्रमुख भरत चव्हाण, नामदेव चव्हाण, विनोद शिरसाठ, दिलीप शिरसाठ, राकेश शिरसाठ, हिलाल नेरपगारे, भिका शिरसाठ, शिवाजी शिरसाठ, राजीव महाले, संजय शिरसाठ, भास्कर पवार, तुळशिदास निकम, प्रभाकर नेरपगार, राजीव महाले, निलेश महाले, तुकाराम वाघ अनिल महाले, सह सर्व समाज बांधव यांनी परीश्रम घेतले.