गोपी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे हळपे दाम्पत्याचा सत्कार
चोपडादि.३०(प्रतिनिधी) - येथील गोपी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेत , महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा बी एस हळपे यांनी डीएसएम परीक्षा (सन २०२१) विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केल्याबद्दल व विवेकानंद माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका सौ माधुरी भगवान हळपे यांना समाजकार्य महाविद्यालय व इनरव्हीलक्लब तर्फे गुणवंत शिक्षिका पुरस्कार(सन२०२१) मिळाल्याबद्दल तसेच चि.हिमांशू भगवान हळपे याचा २०२१ नीट परीक्षेद्वारा एमबीबीएस ला नंबर लागल्याबद्दल , गोपी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पतसंस्थेचे चेअरमन श्री मुरलीधर वामनराव पाटील व पतसंस्थेच्या संचालिका सौ रुपाली संजय पाटील यांच्या हस्ते हळपे दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अॕड प्रकाश आनंदराव पाटील,संचालक जयंत महाजन ,वामनराव चौधरी, प्रविण पाटील सौ सिमा पाटील , व्यवस्थापक राजेंद्र स्वामी, कॕशिअर सौ सपना पाटील आयुष पालिवाल व पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.