जि.प.आरोग्य संघटनेचे ग्रामविकास मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
फोटो कॅप्शन:मंत्री महोदय मा.गिरीश महाजन यांना निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष-विजय देशमुख, कोषाध्यक्ष-प्रेमलता पाटील, राजेश कुमावत, सह.. संघटना पदाधिकारी-ज्ञानेश्वर पाटील, राकेश शिंपी, रविकिरण पवार, शीतल रोकडे, कांतीलाल पाटील
चोपडा दि.३०(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार .गिरीशभाऊ महाजन यांना मराजीप आरोग्य कर्मचारी संघटना 257/89 चे जळगांव जिल्हाध्यक्षा सह, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी समवेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचा दरमहा उशिराने होणाऱ्या वेतनासोबतच.. आरोग्य कर्मचारी हिताच्या प्रलंबित महत्त्वाचे मागण्यांसंदर्भात.. केंद्रीयअध्यक्ष-महेशजी जाधव, कोषाध्यक्ष-वैष्णवजी , यांचे तथा जळगांव जिल्हा कार्यकारिणी यांच्या निवेदनाचे पत्र प्रत्यक्ष मा.मंत्री महोदय यांना जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले,
ग्रामविकास मंत्री .गिरीश भाऊ यांनी कर्मचारी वर्गाच्या मागण्यांचे संदर्भात सर्व प्रश्न शांततेत एकुण व समजुन घेतले तसेच त्यांनी सर्व प्रलंबीत मागण्यांना सकारात्मक पणे प्रतिसाद दिला आहे.
तद्नंतर मंत्री महोदय यांचे, आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने.. पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी.. जिल्हाध्यक्ष-विजय देशमुख, कोषाध्यक्ष-प्रेमलता पाटील, सरचिटणीस-ज्ञानेश्वर पाटील, कार्याध्यक्ष-राजेशजी कुमावत, जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष-राकेश शिंपी, सह सरचिटणीस-रवीकिरण पवार, सचिव कार्यव्यवस्थापक-कांतीलाल पाटील, जिल्हा संघटक-शीतल रोकडे आदी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.