दिव्यांग बांधवांस मारहाण तहसीलदारांना निवेदन
चाळीसगाव,दि.३० ( प्रतिनिधी);जामदा येथे एकट्या दिव्यांग बांधवांचे अतिक्रमण हटवून मारहाण केल्याप्रकरणी कोळी समाज संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला आहे.
दिनांक २९/०८/२०२२ सोमवारी मौजे जामदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे झालेल्या आपल्या आदिवासी कोळी जमातीच्या दिव्यांग बांधवांस ग्रामपंचायतीत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि बी. डी. ओ. यांनी कोणालाही विश्वासात न घेता एकुण २५ दुकानांपैकी फक्त आपल्या आदिवासी तेही अपंग माणसांच्या दुकानांना अतिक्रमणच्या नावाखाली हटवले म्हणून चाळीसगाव तहसीलदार यांना जामदा येथील श्री. दिपक भाऊ कोळी तसेच स्थानिक समाज बांधव व किशोर भाऊ शेवरे, धनराज कोळी, कैलास कोळी, भाऊसाहेब चव्हाण, गणेश भाऊ कोळी, माधव कोळी,सोनु
कोळी, मनोज कोळी,तर्फे निवेदन देण्यात आले. मा. तहसीलदार साहेबांनी सांगितले की आपण याच्यातून योग्य असा मार्ग काढू ,कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ. याप्रसंगी समाज बांधव उपस्थित होते.