चोपडा महाविद्यालयात 'मॅरेथॉन स्पर्धा' उत्साहात संपन्न*

 *चोपडा महाविद्यालयात 'मॅरेथॉन स्पर्धा' उत्साहात संपन्न*





चोपडा,दि.३०(प्रतिनिधी):  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष' व 'राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त' दिनांक २९ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता 'भव्य मॅरेथॉनचे' आयोजन करण्यात आलेले होते. ही मॅरेथॉन पुरुष मोठा गट, मुले लहान गट व महिला मोठा गट, मुली लहान गट अशा चार गटात आयोजित करण्यात आली होती. या मॅरेथॉनचे उदघाटन चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.डी.एम.कुनगर व  सुप्रसिद्ध वैद्यक डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते स्व.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ.आनंद पाटील, सौ. मीना सोमानी, सौ.चंदाताई पाटील, श्री.अशोक साळुंखे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी,  उपप्राचार्य प्रा.एन.एस. कोल्हे,  उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, महात्मा गांधी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.एस.सोनवणे तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.शैलेशकुमार वाघ, क्रीडा संचालिका सौ.के.एस.क्षीरसागर, लेप्टनंट डॉ.बी.एम.सपकाळ व क्रीडा संचालक श्री.अमोल पाटील आदि उपस्थित होते. 

    यावेळी सौ.चंदाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, 'आपल्या आयुष्यातील काही वेळ योग, व्यायामासाठी व खेळासाठी द्यायला हवा.त्यामुळे शरीर निरोगी राहायला मदत होते.' प्रसिद्ध वैद्यक डॉ.चंद्रकांत बारेला मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, 'ज्यांचे आरोग्य तंदुरुस्त असते त्यांना कोणताही आजार होत नाही. नियमित व्यायाम, योगा केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते म्हणूनच जीवनातील काही क्षण व्यायामासाठी द्यावा. आयुष्यात धावले पाहिजे त्याशिवाय जगातील कोणतीही स्पर्धा जिंकता येत नाही.'

   अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, 'सर्वांनी रोज चाललं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे त्याच्याने मानसिक व शारीरिक स्वास्थ उत्तम राहते.

   या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी केले तर आभार लेप्टनंट डॉ.बी.एम.सपकाळ  यांनी मानले.

      या मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी पोलिस उपअधीक्षक श्री. कृषिकेश रावले, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे कार्यकारी संचालक प्रा. डी. बी. देशमुख, अभियंता श्री.संतोष बाविस्कर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, श्री.अशोक साळुंखे,  उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य श्री. एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, महात्मा गांधी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.एस.सोनवणे, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

    या मॅरेथॉनमध्ये ३५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.  या मॅरेथॉनचे प्रायोजक म्हणून खानदेश स्पोर्ट्स, जळगाव येथील श्री. संजय जोशी यांचे सहकार्य लाभले. या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या  ७५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते टी-शर्टचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मॅरेथॉनमधील विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या मॅरेथॉन मध्ये पुरुष मोठ्या गटातून दिपक पाटील-प्रथम क्रमांक, सचिन कोळी-द्वितीय क्रमांक, सागर धनगर-तृतीय क्रमांक व भूषण बाविस्कर-उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके प्राप्त केली. महिला मोठया गटातून पिंकी बारेला-प्रथम क्रमांक, सृष्टी सोनार-द्वितीय क्रमांक, पल्लवी कोळी-तृतीय क्रमांक व सोनाली कोळी-उत्तेजनार्थ यांनी पारितोषिके प्राप्त केली.तसेच मुलांच्या लहान गटातून दिव्येश संतोष पाटील-प्रथम क्रमांक, रुपेश विजय कोळी-द्वितीय क्रमांक व कल्पेश जिजाबराव बागुले-तृतीय क्रमांक तसेच मुलींच्या लहान गटातून नंदिनी लीलाधर पाटील-प्रथम क्रमांक, पूनम हिरालाल चौधरी-द्वितीय क्रमांक व ईश्वरी चंद्रकांत करंदीकर-तृतीय क्रमांक या स्पर्धकांनी पारितोषिके मिळविली.

    यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री. कृषिकेश रावले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, 'आजच्या तरुणांनी आपल्या ध्येय पूर्तीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशाचे सुजाण नागरिक बनण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील असायला हवे'.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेशकुमार वाघ यांनी केले तर आभार क्रीडा संचालिका सौ. के.एस.क्षीरसागर यांनी मानले.

      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, क्रीडा विभाग, सर्व समिती प्रमुख व सदस्य यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, स्पर्धक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने