चोपड़यात प्रथमच एकाच छताखाली ३५ बॅंकांच्या हजेरीत कोट्यावधींचे लोन मंजूर ..
चोपडा दि.२८(प्रतिनिधी): आज यादन्यवल्क्य मंडळाचा हॉल मध्ये सकाळी 11 वाजता व्यापारी महामंडळ व रोटरी क्लब चोपड़ा,जिल्हा उद्योग केंद्र,प्रचिती मीडिया आयोजित लोन मेळाव्याचे उदघाटन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी शुभ हस्ते व व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष अमृतभाई सचदेव ,प्रवीणभाई गुजराथी,*लोन मेळावा आयोजक श्री.पंकज दारा सर (चार्टर्ड अकॉउंटेन्ट,जळगाव)*रोटरी क्लब प्रेसिडेंट रूपेश पाटील, नितिन अहिरराव,अतुलनाना ठाकरे ,भरत पाटील सर यांच्या उपस्थितीत सम्पन्न झाला*
आजच्या मेळाव्याला 200 लोकांनी नवीन कर्ज मागणी साठी विविध बँकांमध्ये आपल्या कर्जासाठी विचारणा केली आजच्या लोन मेळाव्याला सुमारे 35 बँक उपस्थित होत्या.आलेल्या प्रत्येक लोन मागणाऱ्या ग्राहकाचे समाधान करण्यात आले.आज रोजी सुमारे 14 कोटी चे लोन मंजूर करण्यात आलेले आहे व 11 कोटीचे लोन प्रोसेस मध्ये आहे.असे म्हणजे एकूण 25 कोटीचे लोन आजच्या मेळाव्यातून लोकांना दिले जाणार आहे व उर्वरित बाकी राहिलेल्या लोकांचे लोन कागदपत्र कम्प्लीट झाल्यावर देण्याचा माणस आहे.लोन मेळावा आयोजनबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला व अनेक बँका एका छताखली भेटल्याने समाधान व्यक्त केले.आजच्या लोन मेळावा यशस्वी करण्यासाठी उपक्रम प्रमुख संजयभाऊ कानडे,सनी सचदेव,राजस जैन,सिद्धार्थ पालीवाल,मनोज कोष्टी,चेतन टाटिया,प्रफुल्ल स्वामी,प्रफुल्ल पाटील, नोमान काजी,संजय शर्मा,रोटरीचे सचिव गौरव महाले, मनोज पाटील, अनिल जोशी (सचिव यदन्यवल्क्य मंडळ) तसेच संजय श्रावगी (कार्याध्यक्ष)सुनील बरडीया(उपाद्यक्ष),श्याम सोनार (उपाध्यक्ष),दीपक राखेचा(उपाध्यक्ष),राजेन्द्र जैन (सचिव),नरेंद्र तोतला(सचिव) व सर्व व्यापारी महामंडळ पदधिकार्यांनी अनमोल सहकार्य केले.श्री.पंकज दारा सर व त्यांची टीम यांनी उत्साहने सर्व बैंक ग्राहकांचे काम करून देण्यासाठी सहकार्य केले.