वन दावेदारांना हेक्टरी १३ हजार रुपये अतीवृष्टी दुष्काळी अनुदान द्यावे आदिवासींची तहसीलदारांकडे मागणी
चोपडा दि.२३(प्रतिनिधी):वन दावेदारांना हेक्टरी १३ हजार रुपये अतीवृष्टी दुष्काळी अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांचे निवेदनआमदार सौ लताताई सोनवणे व तहसिलदार अनिल गावित यांना आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी दिले आले.मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करु असा ईशारा देण्यात आला आहे.
निवेदनात आदिवासी बांधवांच्या अज्ञानामुळे वंचित राहुन गेलेले वनदावे मा तहसिलदार यांनी दाखल करुन घ्यावे, २०१६ च्या जि आर प्रमाणे २ पुरावे ग्राह्य धरून आदिवासी नां वनपट्टे मिळावे,पात्र, अपात्र, प्रलंबित, अंशतः पात्र वनदावेदारांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सानुग्रह अनुदान मिळावे आदि मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
त्यात सातपुडा पर्वत रांगेत राहणारे आदिवासी पावरा,बारेला, भिल्ल,कोळी असा आदिवासी समाज डोंगराळ भागात हाजारो वर्षा पासून राहत असुन यांचे जिवनमान उंचावून सामाजाच्या प्रवाहात यावे यासाठी सन १९७२ ला केंद्र सरकारने वनहक्क कायदा मंजुर केला .कारण जल, जंगल जमिन याचे मुळ मालक हे आदिवासीच आहेत.१९७२ पासून त्यांना वनहक्क देणे सुरू आहे. सध्या आदिवासी त्याच जमिवर उदरनिर्वाह करीत आहेत.आदिवसी बंधु भगिनीं जर शेतातील मशागत निंदणी टुपणी करता,त्यांना पोटभरण्याचे फक्त ऐवढेच साधन आहे. आज त्यांचे वनदावे हे प्रलंबित, अपात्र, अंशतः पात्र,अपिलार्थि या स्थितीत दाखल आहेत. जो पर्यंत उपविभागीय समिती व जिल्हा समिती किंवा कोर्टाची प्रक्रिया सुरू असेल तर वन विभागाने व कार्यरत असलेल्या वन कर्मचारी यांनी वनदावेदार यांना त्रास देवु नये.असे असतांना देखिल वनकर्मचारी त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात व सरळ जेल मध्ये टाकतात. हे योग्य नाही. प्रलंबित, अपात्र, नविन दाखल,अंशदापात्र,वनदावेदारांना शासनाने सरासरी प्रत्येक वनदावेदांना हक्काचे ४ हेक्टर वनपट्टे द्यावे!! व त्या जमिनिवर आंबे,बोरी,मोहु,चिकी सिताफळ,संत्री, मोसंबी,तेंदुपत्ता,अश्या प्रकाराची फळ झाडे व ईतर वनोऔषधी धावडा,अंजन,खैर या वनोऔषधी, फळबाग लागवड करण्यासाठी आदिवासी यांना शासनाने अनुदानाची तरतूद करावी म्हणजे झाड फक्त शासनाचे आणि फळ आमचे आदिवासी चे ही योजना शासनाने तयार करून अंमलात आणली तर जंगल ताठ मानेने उभा राहवा असेही स्पष्ट केले आहे.
यावेळी संजय शिरसाठ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बहिष्कृत वेल्फेअर फौंडेशन इंडिया रजि दिल्ली तथा जिल्हा सरचिटणीस शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा,गणदास बारेला,देवसिंग पावरा,ताराचंद पाडवी,खेलसिंग बारेला,यासु बारेला,गेलसिंग बारेला,बालसिंग बारेला, मधुकर भिल,खुमसिंग बारेला,जतन पावरा, सुरेश पावरा,गुडा पावरा,गजिराम पावरा,पिटु बारेला,चंपालाल पावरा, गंगाराम बारेला,मिचऱ्या बारेला,रिया बारेला,आमाश्या बारेला ,रेहंजल बारेला, रायसिंग पावरा,सायसिंग पावरा,कालसिंग पावरा, बिहारी बारेला,प्रताप बारेला,जाहंगा बारेला यांच्यासह शेकडो आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.