सुरमाज फाऊंडेशनतर्फे दहावी चे विद्यार्थीनींना मोफत पुस्तक, नवनीत सेट व कंपास पेटी वाटप..
चोपडा दि.२३(प्रतिनिधी): सामाजिक कामात नेहमीच मदतीचा हात देणाऱ्या सूरमाज फाऊंडेशनने हलाखीची परिस्थिती असणाऱ्या इयत्ता १०वी च्या गरीब आदिवासी विद्यार्थीनींना नवनीत सेट, पुस्तके व कंपास बॉक्स वाटप करून मोलाचा हात दिला आहे.
कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात सुरमाज फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी प्रत्यक्ष भेट देऊन इयत्ता १० वी वर्गातील विद्यार्थीनींच्या समस्या जाणून घेऊन काही विद्यार्थी पैशां अभावी पुस्तक घेऊ शकत नाही ही एक शोकांतिका आहे.हे त्यांनी ओळखून १०वी वर्गाचे पुस्तके,नवनीत सेट व कंपास बॉक्स ताबडतोब आणून विद्यार्थीनींना वाटप केले.
आपल्या शिक्षणात आपली गरिबी आडवी येऊ नये ह्या उदात्त हेतूने प्रेरित होउन सुरमाज फाउंडेशन कार्य करते आहे अशी माहितीही हाजी उस्मान शेख यांनी यावेळी दिली.याप्रसंगीश्री. वसतीगृह अध्यक्ष महेश पी. शिरसाठ (पत्रकार) आणि जियाउद्दीन काझी सामाजिक कार्यकर्ते उस्मान शेख, डॉ. मोहम्मद रगीब, अबुलस शेख, मुजाहिद ए इस्लाम शेख, डॉ. मोहम्मद जुबेर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.