*चोपडा येथे वर्षावास व्याख्यानमाला-१० संपन्न
चोपडा दि.२२( प्रतिनिधी): दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडाच्या वतीने आषाढ पौर्णिमा दि.१३ जुलै २०२२ पासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात करण्यांत आली असून आज दि.२१ऑगस्ट२०२२ रविवार रोजी ठिक.५ ते६ यावेळेत *गौतम नगर समाज मंदिर चोपडा* येथे वर्षावास पर्वानिमित्त *सिम्बॉल ऑफ नॉलेज (ज्ञानाचे प्रतिक)* या विषयावर *व्याख्याते-आयु.बापूराव गिरधर वाणे सर*(तालुका अध्यक्ष भा.बौ.महासभा) यांनी सविस्तर धम्मदेसना देवून प्रवचन दिले.
यावेळी प्रथम शांतीदूत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण,पंचशिल,बुद्धवंदना म्हण्यांत आले.तसेच भारतीय बौद्ध महासभेचे *शहराध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ सर यांचे वडील कालकथीत भिमराव निळकंठ शिरसाठ यांचा ९वा.स्मृतिदिवसा निमित्त* त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यांत आली.कालकथीत भिमराव शिरसाठ यांच्या प्रतिमेचे मान्यवर व कु.प्रणाली भरत शिरसाठ यांच्या हस्ते पूजन करून मार्ल्यापण केले.तसेच त्यांच्या जीवनावर रमेश सोनवणे व बापूराव वाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक आयु.सुकदेव बाविस्कर (आडगांव) यांनी केले.वर्षावास कार्यक्रमास जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,तालुकाध्यक्ष बापूराव वाणे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ,जेष्ठ सभासद सुदाम ईशी अप्पा,माजी तालुकाध्यक्ष सुदाम करनकाळ,बसपाचे संजय अहिरे,प्रा.सपकाळे,अनिल वाडे,रमेश सोनवणे,देवानंद वाघ सर,संजय सांळुखे सर,आदी बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.वर्षावास कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय म्हणून भरत शिरसाठ यांनी आभार केले.