चोपडा रोटरी क्लब तर्फे "मानवसेवा तीर्थ "येथे लोखंडी रॅक व खुर्च्या भेट

 चोपडा रोटरी क्लब तर्फे "मानवसेवा तीर्थ "येथे लोखंडी रॅक व खुर्च्या भेट


चोपडा,दि.२३( प्रतिनिधी )दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी चोपडा रोटरी क्लबला रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला यांनी  ओ. सी. व्ही. च्या निमित्ताने भेट दिली.

 या भेटीदरम्यान चोपडा रोटरी क्लब च्या वतीने आयोजित विविध प्रकल्प प्रकल्पांना भेट देऊन प्रांतपाल महोदयांनी पाहणी केली.

  प्रांतपाल यांच्या हस्ते अमरसंस्था संचलित *मानवसेवा तीर्थ* वेले येथे मनोरुग्णांच्या सेवेसाठी चालणाऱ्या प्रकल्पास चोपडा रोटरी क्लब च्या वतीने तीन लोखंडी रॅक आणि दहा खुर्च्या अशी एकूण वीस हजार रुपये रकमेची साहित्य प्रांतपाल महोदयांच्या हस्ते भेट देण्यात आले.

 तसेच रोटे. श्री. अरुण सपकाळ यांच्या वतीने भोजन पट्टी आणि रोटे. श्री .अर्पित  अग्रवाल यांच्यातर्फे दैनंदिन उपयोगाच्या आवश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले.

 याप्रसंगी केंद्राचे संचालक श्री नरेंद्र पाटील यांनी मनोरुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या व अत्यावश्यक सहयोग देणाऱ्या चोपडा रोटरी क्लब चे विशेष आभार मानले. याप्रसंगी प्रांतपाल महोदयांच्या सुविद्य पत्नी सौ. मोनिका झुनझुनवाला आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांची विशेष उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने