*एक दिवसीय सेमिनार ने सदस्य झाले रिफ्रेश*
चोपडा ,दि.२३(प्रतिनिधी )चोपडा रोटरी क्लबच्या वतीने आयोजित मेंबर्स ओरिएंटेशन सेमिनार रीजन 3 चे आयोजन यशस्वीरित्या पार पडले .या सेमिनारमध्ये जळगाव जिल्ह्यातील 18 रोटरी क्लबच्या एकूण 120 सदस्यांनी सहभाग नोंदविला.
सेमिनार मध्ये रोटरी ची ABC पासून तर यशस्वी रोटेरियन होण्यापर्यंतच्या प्रवासा संदर्भातील सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. यात रोटेरियन ची भूमिका, विविध उपक्रम आणि प्रकल्पामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागासंदर्भात मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सेवाप्रकल्प तसेच रोटरी फाउंडेशन मार्फत तळागाळातील आणि खऱ्या अर्थाने गरजू समूहापर्यंत राबविण्यात येणारे विविध उपक्रम इत्यादी बद्दल सविस्तर चर्चा झाली.
खऱ्या अर्थाने या सेमिनारमुळे उपस्थित सर्व रोटरी सदस्य क्लब साठी आपली योगदान देण्यासंदर्भात रिचार्ज झालेत.
या सेमिनारसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी प्रांतपाल श्री राजीव शर्मा ,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भैय्यासो ॲड संदीप पाटील उपस्थित होते.
सेमिनारसाठी संयोजक म्हणून रोटे व्ही एस पाटील आणि सहसंयोजक म्हणून रोटे संजीव गुजराथी यांनी काम पाहिले. सेमिनारच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व रोटरी सदस्यांनी चोपडा रोटरी क्लबच्या टीमचे मनापासून अभिनंदन केले आहे.