पहूर येथे टायगर ग्रुपतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*

 *पहूर येथे टायगर ग्रुपतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप*


पहूर,दि.२३( प्रतिनिधी) :पहूर येथे टायगर ग्रुपतर्फे महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .

शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही.व्ही घोंगडे  या होत्या . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे , शरद बेलपत्रे , प्रवीण कुमावत यांच्यासह टायगर ग्रुपचे अंकुश जाधव , अमोल बावस्कर , हर्षल भोंडे ,  दीपक कुमावत,गिरीश जाधव , वैभव गायकवाड , सुशील जाधव ,भूषण द्राक्षे  यांची उपस्थिती होती .

   टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या सहकार्याने शाळेतील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश , दप्तर , वह्या ,पाणी बॉटल , कंपास पेटी , पेन इ . शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले .

यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे यांनी   टायगर गृपच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले . प्रारंभी शाळेतर्फे मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले,सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले,आभार बनकर मॅडम यांनी मानले .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारीव विद्यार्थी यांनी अनमोल सहकार्य केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने