धनगर समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न
त-हाडी,ता.शिरपुर,दि३०,(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे)शिरपूर तालुका धनगर समाज कर्मचारी मंच संचलित पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांच्यावतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मल्हार लॉन्स येथे संपन्न झाला . सदरील बहुउद्देशीय संस्थेचा उद्देश हा धनगर समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा व त्यांना भविष्यात शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेच्या माध्यमातून धनगर समाजातील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील भाऊ वाघ सरचिटणीस धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुदाम नथू भलकार . उखाजी बंडू ठाकरे . रामचंद्र उखा ठाकरे. डॉ. निता सोनवणे . मालेगाव येथील मोटार वाहन निरीक्षक पवन कुमार धनगर , निंबाजी ओंकार धनगर. सुनील भलकार, मनोज धनगर, रंजनाबाई हिम्मत धनगर. सरला पांडुरंग धनगर. रत्नाबाई रावसाहेब धनगर, सुनील धनगर, दिलीप नथू धनगर, विठ्ठल लांडगे , डॉ. सचिन सूर्यवंशी , ग्रामपंचायत सदस्य किरण भलकार , दीपक धनगर . रुपाली प्रमोद धनगर मंगलाबाई दिलीप धनगर , परशुराम धनगर उत्तम धनगर, युवराज धनगर . डी ओ धनगर , गणपत धनगर . मुकुंदा पाकळे. रावसाहेब चव्हाण पंडित धनगर. आसाराम धनगर . सागर धनगर. वसंत धनगर , तुकाराम पाकळे,विशाल भलकार, संजय धनगर सुषमा बन्सीलाल धनगर. ज्योती महेश धनगर. ललिता मनोज. धनगर वैशाली हिवराळे आदी मान्यवर सदरील गुणगौरव सोहळ्याला उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.