पाचकंदील भागात विजय स्तंभावर बॅनर लावणे थांबवावे.. मुख्याधिकारींकडे मागणी
शिरपूर दि.३०(प्रतिनिधी) शहरात चक्क विजय स्तंभावर बॅनर लावण्याचा प्रकार वाढत असून या गंभीर प्रकाराकडे नगरपालिकेचे दूर्लक्ष असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे तरी न.पा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून बॅनरलावणे थांबवावे अशी मागणी होत आहे.
शिरपूर शहरातील मध्यवती ठिकाणी असलेला पाचकंदिल, विजयस्तंभावर प्रसिध्दी बॅर्नर लावण्यात येत असतात, स्तंभ हा बलीदान व विजयाचे प्रतिक असून त्यावर शुभेच्छ / प्रसिध्दी बॅर्नर लावणे योग्य नाही. त्यामुळे विजयस्तंभाची विटंबना होत असते. तरी विजयस्तंभावर असलेले बॅनर तात्काळ काढावेत व यापुढे कुठल्याही प्रकारचे बॅनर लावल्यास प्रशासनाकडून परवानगी न देता लावणाऱ्यांवर योग्यती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नयन माळी यांनी केली यावेळी आशीष धाकड,नंदू राजपूत,गोलू लोहार आदि उपस्थित होते.