नवनिर्वाचित प्रादेशिक सल्लागार समितीची बैठक संपन्न
उल्हासनगर दि.२८(प्रतिनिधी): दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार, प्रादेशिक संचालनालय नाशिक च्या अंतर्गत येत्या दोन आर्थिक वर्षा साठी नवनिर्वाचित प्रादेशिक सल्लगार समितीची बैठक दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी संपन्न झाली. सदर समिती ची महत्वाची भूमिका कामगार शिक्षणाचे कार्य सुव्यवस्थित व प्रभाविपणे होण्यासाठी सहकार्य करणे आहे. सदर समिती साठी कामगार संघटना, एनजीओ, केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विभाग, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर सभासद म्हणून नियुक्त केल्या जातात. या समितीचा कार्यकाल दोन वर्षाचा असतो. श्री वि गो पेंढारकर हे सदर समितीचे अध्यक्ष आहेत. सरकारी प्रतिनिधी म्हणुन श्री एस टी शिर्के - सहाय्यक कामगार आयुक्त, डॉ. प्रवीण घोडेस्वार - डायरेक्टर वाय सी एम यु, डॉ राकेश गावित - आरोग्य अधिकारी तसेच श्री राजू देसले, श्री अरुण पिवल, श्रीमती विद्या गडाख, श्रीमती सुचित्रा गांगुडे हे संघटना प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व संघटना प्रतिनिधी म्हणून श्रीमती मीनाक्षी पवार, श्री अशोक सिंग हजारी, श्री उत्तम रकिबे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कामगार शिक्षण मंडळाचा मागील दोन वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात आला. कामगार शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रादेशिक संचालिका श्रीमती सारिका डफरे यांनी या आर्थिक वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती देत, उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले. तसेच समितीचे अध्यक्ष व इतर मान्यवर सदस्यांच्या सूचना नोंदवून घेण्यात आल्या. सर्व मान्यवरांनी सदर बैठकीसाठी अतिशय प्रभावीपणे सहभाग नोंदवला असे वक्तव्य करत आभार प्रदर्शन करून मीटिंगची सांगता झाली.