माझी वसुंधरा,स्वच्छ वसुंधरा* उपक्रम सोत्साहात

 *माझी वसुंधरा,स्वच्छ वसुंधरा* उपक्रम सोत्साहात


पाचोरा,दि.२८(प्रतिनिधी राजेंद्र खैरनार): तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.वि. मंदिर येथे पाचोरा नगरपालिका तर्फे *"माझी वसुंधरा"* हा  उपक्रम राबविण्यात आला.या प्रसंगी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्री भोसले सर,उप मुख्याधिकारी मराठे सर,पाणी पुरवठा अभियंता श्री मोरे सर,संगणक अभियंता श्री माने सर,फायरमन राजू कंडारे,लिपिक गोसावी सर,शहर समन्वयक श्री रवि पवार आदी साहेब उपस्थित होते.या वेळी शाळेचे शिक्षक श्री माने सर यांनी या उपक्रमाची प्रस्तावना करून विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस होत असणारा पर्यावरणाचा ऱ्हास,वाढते जलप्रदूषण आणि आणि त्याला पर्याय म्हणून विविध मुर्तीं साठी शाडू मातीचा करण्यात येणारा वापर याचे महत्त्व पटवून दिले ,तसेच श्री राजेश कुंभार सर यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती पासून गणपती कसा तयार करायचा ? याचे प्रशिक्षण दिले. तसेच गणपती विसर्जनाच्या दिवशी सर्व निर्माल्य ठीक ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या निर्माल्य पेटीतच टाकावे असे आवाहन सर्वांना केले. कार्यक्रमच्या शेवटी श्री आशिष पाटील सर यांनी सर्व पदाधिकारी वर्गाचे आणि सर्व विद्यार्थी-शिक्षकांचे आभार व्यक्त केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने