पाटील माध्यमिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी.*

 पाटील माध्यमिक विद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती साजरी.* 


   शिरपूर,दि.२८ .( प्रतिनिधी)  त-हाडी येथील स्व. अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील विद्यालयात आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या उपशिक्षिका नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष भामरे. मुख्याध्यापक एन एच कश्यप  ज्यु .सायन्स कॉलेजचे प्राचार्य नितीन पाटील व सर्व शिक्षक बंधू यांनी बहिणाबाई चौधरी यांचे प्रतिमेचे पूजन केले

संपूर्ण महाराष्ट्रात बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीन सप्ताह निमित्त बहिणाबाईच्या जीवन गाणी या अंतर्गत एस.बी. अंतुर्लीकर माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील उपशिक्षक कांतीलाल भगवान लोहार यांनी आमच्या विद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या

 बोली मनी अहिराणी जशी दही मान लोणी

 सगया ताकना पारखी. ईन्ही पारख क ई कोणी अहिराणी

ही एक समृद्ध बोलीभाषा आहे. जिच्यात बरीच लोकगीते ओव्या लोककला. म्हणी हा सांस्कृतिक ठेवा जपणे ही आज काळाची गरज आहे अहिराणी खानदेशी साहित्य आणि परंपरेचा अनमोल ठेवा आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी केलेला एक छोटासा प्रयत्न या बहिणाबाईंची जीवन गाणी या माध्यमातून करत आहे असे मत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक एन.एच.कश्यप यांनी मनुष्य जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून येणारा अनुभव उपयुक्त असून त्यातून मनुष्य जीवनाला खरा आकार प्राप्त करून घेता येतो असे त्यांनी मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक आर एस चव्हाण यांनी केले आभार प्रदर्शन प्राचार्य. नितीन पाटील  यांनी केले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने