रोटरी क्लब चोपडा च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 रोटरी क्लब चोपडा च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप




चोपडा दि.०५(प्रतिनिधी):   सातपुड्याच्या पर्वतरांगेतील दुर्गम भागातील एक आदिवासी पाड्याचे गाव म्हणजेच गौऱ्यापाडाव ता.चोपडा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या एकूण 110 विद्यार्थ्यांना वर्षभराचे सर्व शैक्षणिक साहित्य आणि शालेय दप्तर अशी एकत्रित भेट  देण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले .याप्रसंगी प्रकल्प प्रमुख रोटे विपुल छाजेड, अध्यक्ष ॲड श्री.रुपेश पाटील 

मानद सचिव रोटे गौरव महाले उपस्थित होते.  शारदा मॅथ्स परिवारातील विद्यार्थ्यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.

 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास आनंददायी व्हावा म्हणून दिलेल्या भेटीबद्दल सर्व शिक्षकांनी विशेष आभार मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने