अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 'छात्र नेता संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न ..हंसराज चौधरी याची शहर मंत्री पदी निवड

 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 'छात्र नेता संमेलन' मोठ्या उत्साहात संपन्न ..हंसराज चौधरी याची शहर मंत्री पदी निवड


 शिरपूरदि.०२ ( प्रतिनिधी) शिरपूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने छात्र नेता विद्यार्थी संमेलन घेण्यात आले. सदर संमेलन हे दिनांक ३० जुलै रोजी शहरातील सरस्वती महाविद्यालयात घेण्यात आले. संमेलनात परिषदेच्या शहरमंत्री पदी हंसराज चौधरी यांची निवड करण्यात आली.

       अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपुर तर्फे ३०  जुलैला सरस्वती महाविद्यालयात 'छात्र नेता विद्यार्थी संमेलन' आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताच्या प्रदेश मंत्री  अंकिता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे विद्यार्थी संमेलन पार पडले.यावेळी सहकार भारतीचे क्षेत्रीय संघटन मंत्री दिलीप लोहार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा प्रमुख प्रा. अमोल मराठे उपस्थित होते.

    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही देशातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेला ९ जुलै रोजी ७४ वर्षे पूर्ण झालेत. सातत्याने अविरतपणे काम करणारी ही विद्यार्थी संघटना राष्ट्रीय स्तरावर, प्रदेश स्तरावर,जिल्हा स्तरावर, शहर स्तरावर, शैक्षणिक वर्षासाठी आपली कार्यकारिणी जाहीर करत असते.वर्षे २०२१-२२ मध्ये शिरपूर शाखे तर्फे विद्यार्थी तसेच विद्यार्थी हितासाठी करण्यात आलेल्या  कामाचा आढावा (मंत्री प्रतिवेदन) हंसराज चौधरी यांनी मांडला.

          संमेलनात प्रदेश मंत्री अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करतांना विद्यार्थी परिषदेने मागील काळात केलेले आंदोलन, आयोजित केलेले अभियान, विद्यार्थी परिषदेची आगामी दिशा व सामाजिक मुद्द्यांवर विद्यार्थी परिषदेची असलेली भूमिका मांडली.

     संमेलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शिरपूर शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली,यात तालुका संयोजक म्हणून सुमित गिरासे व  शिरपूर शहरमंत्री म्हणून हंसराज चौधरी यांची निवड करण्यात आली.तसेच शहर सहमंत्री हिमानी पाटील, पुष्पक जैन, पार्थ राजपूत,मीडिया प्रमुख सागर भामरे, अभ्यास मंडळ प्रमुख देवेंद्र पाटील, कलामंच संयोजक शीतल पाटील, सहसंयोजक मोनाली वाघ, तंत्रशिक्षा विद्यार्थी कार्य प्रमुख  गौरव भोई, स्टुडंट फॉर डेव्हलपमेंट संयोजक संकेत पाटील, स्टुडंट फॉर सेवा संयोजक मीनल पाटील यांची निवड करण्यात आली.

          अभाविप शिरपूर नवनिर्वाचित शहरमंत्री हंसराज चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संकेत पाटील याने केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने