अंगावर गरम गरम तेल फेकत गल्ला वर मारला डल्ला.. *चिकन सेन्टर मालकावर सिनेस्टाईल गुंडागर्दी.. रावेरात दहशत

 



 अंगावर गरम गरम तेल फेकत गल्ला वर मारला डल्ला.. *चिकन सेन्टर मालकावर सिनेस्टाईल गुंडागर्दी.. रावेरात दहशत

रावेर दि.०१ प्रतिनीधी ( ईश्वर महाजन):रावेर शहरातील उटखेडा रोड भागातील रुस्तम चौक भागात दि. 29 जुन रात्री 8 वाजेच्या दरम्यान रुस्तम चौकात स्थानिक संशयित दोन गावगुंड यांनी ए वन चिकन सेन्टरच्या गाडीवर गुंडगिरी करीत पंधराशे रुपये गल्यातुन हिसकावले

रावेर शहरात  सध्या चोरी गुंडगिरीचे प्रमाणात वाढ होताना दिसत असुन पोलीस प्रशासन यांचा धाक कमी झाल्याचे दिसत असुन ए वन चिकन सेन्टर च्या दुकानात जाऊन दुकान मालक शेख तन्वीर शे शकील अहमद यांच्या अंगावर दुकानातीलच कढईत असलेले गरम तेलाचा लोखंडी झाऱ्यात घेवुन अंगावर फेकले संशयित आरोपी शे सलीम शे अजिज बेग रा .उटखेडा रोड रावेर व शेख तौसीफ शे अफजल राहणार पाण्याच्या टाकीजवळ फतेह नगर रावेर असुन ह्या दोघांच्या विरोधात रावेर पोलीसात चिकन सेन्टर मालक यांनी फिर्याद दिली असुन त्यांच्यावर गुन्हा नोदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल कुमार नाईक हे करीत असुन रावेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या ते नवीन सावदा रोड भागात ॲपे रिक्षा ,ओमनी रहदारी यांची बेकायदा वर्दळ यांचे प्रमाण वाढले असुन ह्या भागात जवळपास पंधरा ते वीस मास विक्री चिकन सेंन्टर ,बेकायदा दुकाने रस्त्यालगत दुकानाची गर्दी दिसत असुन रावेर नगर पालिका व पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेतानां दिसत असुन ह्या भागात शाळेतील मुले मुली शहरातील व परगावातुन येणारे महीला पुरुष याचे पायदळ जा असते यांना नाहक त्रास होताना दिसत असुन हया भागात दोन ते तीन अपघात होवुन जिवीत हानी झालीआहे याकडे लक्ष देण्याचे नागरिकातुन होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने