पावसामुळे नुकसान झालेल्या निराधार विधवा आजीला "आर्यन युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री आर्यनभाऊ मोरे यांनी दिला "किराणा स्वरुप" मदतीचा हात....!*
पाचोरा दि.२५ ( प्रतिनिधी राजेंद्र खैरनार):शहरातील शिवाजी नगर लगत हनुमान नगर या भागात काही दिवसांपूर्वी जोरदार व मुसळधार पाऊस पडल्याने अनेकांच्या घरात पाणी साचले, खुप लोकांचे नुकसान झाले, तसेच हनुमान नगर भागामधील सात ते आठ घरे देखील पाण्यामुळे पडली असेच एक गरीब हलाखीच्या परिस्थितीतील व निराधार विधवा वृद्ध आजी ग.भा.शकुंतलाबाई प्रभाकर ठाकुर यांचे घराची पावसाच्या पाण्याने पडझड आणि आर्थिक नुकसान झाले.असुन आर्यन युवा फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री आर्यनभाऊ मोरे यांचे लहान भाऊ अशोक मोरे यांनी त्या विधवा निराधार आजीस आश्वासन दिले होते कि आम्ही तुम्हाला किराणा भरून देऊं परंतु ते वैयक्तीक कामामध्ये अडकल्याने ते ध्यानात आले नाही आज सकाळी आमच्या आई ने आठवण करून दिली कि तुम्ही त्या आजी ला किराणा भरून देऊ असं सांगितलं परंतु अजून ही दिलेला नाही त्यांनी क्षणाचाही ही विलंब न करता सगळ्यांनी मिळून त्या विधवा आजी ला किराणा भरुन दिला.अशी सर्व च ठिकाणी मदतीला धावून येणारी आर्यन युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य/ पाचोरा" यांचे पंचक्रोशीत कौतुक करावे तेवढे कमीच आहे..