जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सभासदांना.. दिलेलेच जाहीरनामा वचन पूर्तीस प्रारंभ.. चोपड्यात २५ वर्षे अविरत सभासदांना ५ हजारांचा धनादेश वितरित*

 




जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी सभासदांना..  दिलेलेच जाहीरनामा वचन पूर्तीस प्रारंभ.. चोपड्यात २५ वर्षे अविरत सभासदांना ५ हजारांचा  धनादेश वितरित*

चोपडा दि.२४ (प्रतिनिधी ) जळगांव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी जळगांव अर्थात ग.स सोसायटी तर्फे आज शहरातील नारायण वाडी मधील विठ्ठल मंदिरासमोर जेष्ठ नागरिक सभागृहात संस्थेत अखंड २५ वर्ष तसेच ३० वर्ष सभासद झालेल्या तालुक्यातील ९५ सभासदांना पाच हजार एक रुपयांचा धनादेश देत सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान माध्यमिक पतपेढी चे माजी अध्यक्ष आर. एच. बाविस्कर सर यांनी भूषविले .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सुर्यवंशी यांच्या काळात संस्थेत जेष्ठ सभासद सन्मान निधी योजना, राजमाता जिजाऊ कन्यादान योजना, सावित्रीबाई फुले योजना अश्या विविध योजना सुरुवात करण्यात आली. संस्थेत यावेळी ही सभासदांनी सहकार गटाला कौल दिल्याने गटाने इलेक्शन पूर्वी ज्या सभासदांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली आहे यात कर्जावरील व्याजदर कमी कर्ज वाढ, ऑन लाईन प्रणाली झाली असून आता सभासदांना जामीनदाराची माहिती काढण्यात इतर शाखेवर जाण्याची गरज नाही. येणाऱ्या जनरल मिटिंग मध्ये मयत सभासदांना शंभर टक्के कर्ज माफी, तसेच जनता अपघात विमा ३ लाखावरून १० लाखापर्यंत सुरुवात लवकरच करण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. एच. बाविस्कर आपल्या भाषणात म्हटले कीसभासदांनी सहकार गटाला कौल दिल्याने अध्यक्ष उदय पाटील सहकार गट हे सभासदाच्या हिताचे निर्णय घेतील व सभासदांसाठी नवनवीन योजना अजून आणतील अशी ग्वाही यावेळी आर. एच. बाविस्कर सरांनी दिली. यावेळी संस्थेचे माजी संचालक रमेश शिंदे, सन्मान प्राप्त शिक्षक अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले..
व्यासपीठावर सहकार गटाचे कोषाध्यक्ष व्ही. झेड. पाटील, श्रेष्ठी तथा संचालक रमेश शिंदे, माजी मुख्याध्यापक मधुकर पाटील, जेष्ठ शिक्षक मंगेश भोईटे सहकार गटाचे अध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष उदय पाटील, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र सोनवणे, माजी अध्यक्ष गटाचे गटनेते तथा संचालक अजबसिंग सुनिल सुर्यवंशी, पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा संचालक अजय देशमुख, कर्ज नियंत्रण समिती चे अध्यक्ष तथा संचालक योगेश इंगळे, संचालक भाईदास पाटील, महेश पाटील, योगेश सनेर, मंगेश भोईटे जळगांव शिक्षण विस्तार अधिकारी तथा संचालक विजय पवार, माजी संचालक देवेंद्र पाटील, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे संस्थेचे व्यवस्थापक वाल्मिक पाटील, लेखापाल श्यामकांत सोनवणे, प्रशासन अधिकारी महेंद्र मोरे, शाखाधिकारी संजय साळुंखे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक मंगेश भोईटे यांनी तर सुत्रसंचालन संजय बारी सर तर आभार प्रदर्शन संचालक योगेश सनेर सर यांनी केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने