*काजीपुरा येथे वर्षावास व्याख्यानमाला-३*
चोपडा दि.२५(प्रतिनिधी ) बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडाच्या वतीने आषाढ पौर्णिमा दि.१३ जुलै २०२२ पासून वर्षावास कार्यक्रमास सुरुवात करण्यांत आली असून आज दि.२४-७-२०२२ रविवार रोजी ठिक.५ ते ६ यावेळेत *काजीपुरा ता. चोपडा* येथे वर्षावास पर्वानिमित्त *बुध्द धम्म आणि विज्ञान* या विषयावर व्याख्याते-आयु.राजेंद्र पारे (साहित्यीक,आदर्श शिक्षक) यांनी सविस्तर धम्मदेसना प्रवचन दिले. यावेळी प्रथम शांतीदूत भगवान गौतम बुद्ध,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे महिलाच्या हस्ते पूजन करून त्रिशरण,पंचशिल,बुद्धवंदना म्हण्यांत आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक आयु.रमेश गोबा सोनवणे (कार्याध्यक्ष तथा ग्रा.प. सदस्य काजीपूरा) यांनी केले. वर्षावास कार्यक्रमास जिल्हासंघटक हितेंद्र मोरे, तालुकाध्यक्ष बापूराव वाणे, शहराध्यक्ष भरत शिरसाठ, माजी तालुकाध्यक्ष सुदाम करनकाळ, जानकीराम सपकाळे,संजय सांळुखे,रामचंद्र आखाडे,रमेश सोनवणे,हिम्मत सोनवणे,छगन सोनवणे,पंडित सोनवणे,सिताराम सोनवणे,सचिन बैसाणे, राहुल सोनवणे,रंजनाबाई सोनवणे, भटाबाई सोनवणे,संगिता सोनवणे,वैजंताबाई सोनवणे आदी बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते .