*अमळनेरच्या क्रीष्णा बुक मॅनुफॅक्चर्रचे दातृत्व.. कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात मोफत वह्या वाटप* ..
*चोपडा दि.२७(प्रतिनिधी )* शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे असलेल्या अमळनेरच्या क्रीष्णा बुक मॅनुफॅक्चर्र मार्फत चोपडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर बहु उद्देशीय संस्था संचलित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहात अत्यंत गरजवंत विद्यार्थींनींना मोफत वह्या वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
कोरोना नंतर महागाईने सर्वंच क्षेत्रात कमालीचे उग्र रूप धारण केले असून सर्व सामान्य जनतेचे अक्षरक्ष: कंबरडे मोडले आहे.अशातच कागदाचे भाव प्रचंड वाढले असल्याने गरजवंत विद्यार्थींनींना वह्या घेण्यात बराचसा त्रास होईल हा दूरगामी विचार लक्षात घेऊन क्रीष्णा बुक मॅनुफॅक्चर्रचे मालक श्री. समाधान बडगुजर व सौ.बडगुजर यांनी मागासवर्गीय विद्यार्थीनींना मोफत वह्या वाटप करून मोलाचा हात दिला आहे.यावेळी वसतीगृह विद्यार्थीनींनी क्रीष्णा बुक मॅनुफॅक्चर्रने योग्य वेळी मदत केल्याने आमच्या पालकांचे डोक्यावरचे ओझे हलके केल्याच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी वसतीगृह अध्यक्ष महेश शिरसाठ,अधिक्षिका कावेरी कोळी यांच्या सह विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.