आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांचे हस्ते मालोद ग्रा. पं. अंतर्गत तोलाने पाडा चे फलक अनावरण.. आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या सोबत राहण्याचा आदिवासी समाजाचा निर्धार..

 

आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांचे हस्ते मालोद ग्रा. पं. अंतर्गत तोलाने पाडा चे फलक अनावरण.. आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या सोबत राहण्याचा आदिवासी समाजाचा निर्धार..

यावल  दि.२९( प्रतिनिधी) तालुक्यातील मालोद ग्रा प अंतर्गत तोलाने पाडा चे फलक अनावरण आदिवासी समाज सेवक संजीव शिरसाठ यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी बिराम बारेला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.त्यांनी समजाला मार्गदर्शन करतांना सांगितले की आपण सर्व आदिवासी यांनी आमदार सौ लताताई सोनवणे व प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे सोबत खंबिरपणे उभे राहावे कारण ७० वर्षात आदिवासी भागातील विकासकामे  खुंटलेले होते आता  आपले आदिवासी आमदार सौ लताताई सोनवणे  यांच्या आपण सोबत राहू या. नंतर नामसिंग पावरा यांनी भाषणात सांगितले की संजय शिरसाठ सरां मुळे आपला आदिवासी समाज जागृत  झाला आहे.आता आम्ही सर्व आण्णासाहेब प्रा चंद्रकांत सोनवणे यांचे सोबत खंबिरपणे उभे राहावे व आपली विकासकामे करुन घेऊ  असे सांगितले.

या कार्यक्रमाला गणदास बारेला, देवसिंग पावरा,मयुर बारेला, तुकाराम बारैला,नका बारेला, मधुकर भिल,गुडा पावरा,बालसिंग बारेला, राजेश बारेला,सौ सुनिता पावरा,मालसिंग पावरा, कमलेश बारेला, यांचे सह आदिवासी बंधु भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन बिराम बारेला यांनी केले.आभार प्रदर्शन पाडाचे प्रमुख मालसिंग पावरा यांनी मानले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने