पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*

 


*पंकज इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा*

चोपडा दि.१७ (प्रतिनिधी) :--येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित , पंकज इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे दि. १५  जून  रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

         शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांचे अत्यंत मनोरंजक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन्सिल देऊन औक्षण करण्यात आले.विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि खाऊचे वाटप करण्यात आले .शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते वर्गापर्यंत रांगोळी, रंगीत फुगे व फुलांनी सजावट करण्यात आली होती . रांगोळी ,संगीत, ढोल ताशांचा गजर यामुळे सर्व वातावरण चैतन्यमय झाले होते.

      स्वागतोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य संदीप वन्नेरे होते. कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती त्यामुळे विद्यार्थ्यांची खालावलेली गुणवत्ता, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात निर्माण झालेला दुरावा , ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्ययन पद्धतीमधील आव्हाने व या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेने नियोजित केलेले विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि त्यामध्ये पालकांचे आवश्यक असलेले सहकार्य व सहभाग याबद्दल पालकांना मार्गदर्शन  करण्यात आले.

तर व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून मोहन बाविस्कर , अरुण ठाकूर, जितेश अलकरी , तुळशीराम सैंदाणे , डॉ. महेंद्र पाटील ,महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. ममता पाटील आणि इतर सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         शाळेच्या वर्षभराचे नियोजन गणेश साळुंखे यांनी स्पष्ट केले. दरम्यान  पालक प्रतिनिधींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर  पाचवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन सौ. अनिता पाटील , रंजना तायडे  ,शितल भावसार , तस्निम शेख , वर्षा पाटील , रवीना भादले , प्रतिक चौधरी , नितीन बाविस्कर  यांनी केले . कार्यक्रम यशस्वीते साठी बाळू पाटील व सुलभा पाटील यांनी परिश्रम घेतले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने