*प्रताप विद्या मंदिराचे प्रचंड घवघवीत यश* *कु सायली महाजन चोपडा तालुक्यात एस एस सी परीक्षेत प्रथम*
चोपडा दि.१७(प्रतिनिधी) येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने दहावीच्या शतोकोत्तर निकालाची उज्ज्वल व गौरवशाली परंपरा कायम ठेवत कु सायली नितीन महाजन ही विद्यार्थिनी 98. 40% गुण मिळवून चोपडा तालुक्यात व शाळेतून प्रथम आलेली आहे.
जगात कोरोनाचे सावट असूनही चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात 10 वी च्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात प्रयत्नांची पराकाष्ठा करून भरघोस यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मनाचा तूरा पुन्हा एकदा रोवला आहे.
विद्यालयाचा सरासरी निकाल 99.02 % लागला असून महाजन सायली नितीन 98 .40%, महाजन यशश्री सुरेंद्र 95.20%, जैन अमित प्रविण 94.40%, पाटील चैताली दिनेश 94 .20 %, तडवी जिया जावेद 94 .20 %, पाटील अस्मिता अनिल 93.60%, पाटील प्रियंका वासुदेव 93.60 % हे विद्यार्थी प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेतून 90 व त्यापेक्षा जास्त टक्के मिळविणारे एकूण 28 विद्यार्थी आहेत . 10 वी चा सेमी इंग्लिश चा निकाल 100% तर उर्दू विभागाचा निकाल 96 % लागलेला आहे. टेक्निकल विभागाचा निकाल 100% लागला आहे. उर्दू विभागातून कु बागवान मिसबाह अब्दुल रऊफ हिने 81.20 % मिळवून उर्दू विभागातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन राजाभाई मयूर, अध्यक्ष शैलाबेन मयूर ,उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, तसेच संचालक चंद्रहासभाई गुजराथी , भुपेंद्रभाई गुजराथी व रमेश जैन तसेच संस्थेचे समन्वयक गोविंद गुजराथी व प्रशालेचे मुख्याध्यापक आर आर शिंदे, उपमुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी, पर्यवेक्षक एस जी डोंगरे, श्रीमती माधुरी पाटील, एस एस पाटील, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य जे एस शेलार, व शिक्षक बंधू भगिनी लेखनिक कर्मचारी बंधू आदींनी अभिनंदन व कौतुक केले.