सामाजिक कार्यकर्त्यांची सेवा..अन 'गो 'मातेला मिळाले जीवनदान..

 


सामाजिक कार्यकर्त्यांची सेवा..अन 'गो 'मातेला मिळाले जीवनदान..

   चोपडादि.१७ (प्रतिनिधी):--शहरातील हतनुर वसाहत येथील शासकीय शौच खड्ड्यात गाय अचानक पडली होती. सदर शौच खड्ड्यातून गाय चार दिवसांपासून बाहेर निघण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. सदर बाब सर्पमित्र व सामाजिक कार्यकर्ते संदीप मालचे यांना कळल्यावर त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी मदतीसाठी बोलावले.

  शौच खड्ड्यात पडलेल्या गोमातेला आपल्या शिताफीने अतोनात प्रयत्न करून त्यांनी सुखरूप बाहेर काढले  सदर कामी संदीप मालचे यांना अष्टविनायक स्पोर्ट्स क्लबचे मनोज जाधव, रवींद्र जाधव ,पप्पू चित्रकथी ,राकेश मालचे यांनी सहकार्य केले .त्याबद्दल सर्व गोमातेला जीवनदान दिल्या बद्दल सर्वच गो भक्तांचे व  सामाजिक कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने