भूषणावह" भूषण" मित्रत्वाचा ठेवा

भूषणावह" भूषण" मित्रत्वाचा ठेवा

[इवल्याश्या गावांच नांव गुजरात च्या भूमित कोरलं..जिद्द मनातली शेतकऱ्याच्या "सूपूत्राची"]


श्री भूषण कांतिलाल बाविस्कर हे माझे अत्यंत जवळचे मित्र अगदी शालेयजीवनापासून आम्ही सोबत आहोत. भूषण म्हणजे घटत्या उपयोगितेच्या सिंध्दाताला अपवाद असे व्यक्तीमत्व होय

त्याच्याकडे पाहून प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर कधीच समाधान दिसत नव्हते म्हणजेच समाधानी माणूस कुठेतरी थांबून जातो आणि त्याला अजून तरी कुठे थांबायचे नव्हते म्हणून नेहमी एक एक पायरी वर वर जाणारी   आणि ज्ञानाच्या अनुभवाने खोलात शिरणारा

एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला हा मुलगा लहानपासून तल्लख,विचारी, प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्याची धडपड करणारा, लहानपणापासून शेतीच्या कामात वडीलांना मदत करत असे, 

प्राथमिक शिक्षण हातेड येथिल जि. प.च्या शाळेत पूर्ण करून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण देखील हातेड येथिलच श्री शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक हायस्कुल मधुन पूर्ण करून, पुढील शिक्षण म.गांधी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय चोपडा. जि. जळगाव येथे इंग्रजी विषयात बी.ए. पूर्ण करून  त्यांनी पुढे २००८/०९/ला जळगाव येथे आय. एम. आर. काँलेज मधुन आपले एम बी ए. मार्केटींग या विषयावर पदवी प्राप्त करून लागलीच दुसऱ्याच दिवशी नाशिक येथे एका कंपनीत रूजू झाला...आणि येथूनच त्याची पुढची कहाणी सूरू झाली...

पुढे जाऊन भूषण चेन्नई येथे कंपनीच्या कामानित्ताने २ वर्षे काढले. त्याचा फायदा त्यांना पुढील जीवनात नक्की झाला. त्यानंतर पुन्हा नाशिक येथे आले. दरम्यान च्या काळात ते मलेशिया, दुबई त कामाला गेले. त्यांच्या अनुभवाच्या गाठोड्यात श्रीलंका, मँनमार , सिंगापूर या देशात कामाचा अनुभव पाठीशी होता.

नाशिक येथे एका कंपनीत काम करत असताना त्यांना स्वतःच्या मालकीची कंपनी असावी असे वाटायचे. तेव्हा एकदा त्यांनी मला तसे बोलून दाखवले होते. तसेच पुढच्या काही दिवसांत ते त्या तयारीला लागले ते बलाढ्य पगाराची नोकरीत देखील समाधानी नव्हते म्हणजेच काहीतरी करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आणि  त्याच गोष्टीने पुढे जाऊन त्यांनी Verito Engineering Private Limited नावाची कंपनी उभी केली. अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरात स्वतःचे पाय रोवायला जेथे लोकांना दहा दहा वर्षे खर्ची घालावे लागतात तिथे श्री भूषण यांनी अल्पावधीत नावाजलेल्या वटवा एम. आय. डी. सी.  मध्ये स्वताच्या मालकीची जमीन घेऊन मोठी कंपनी उभारली. Verito group  या छोट्याशा  वृक्षाने आता संपूर्ण जगात आपल्या फांद्या विस्तारायला सुरूवात केलीय असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सुरवातीला Electronic Dosing Pump,manufacturer ने सुरवात केली आज कंपनी मध्ये विविध प्रकारचे प्रॉडक्ट  तयार होऊन देशविदेशात  जातात.त्यांनी माझ्या हातेड गावाचे, शाळेचे, काँलेजचे आणि आपल्या विद्यापिठाचे नाव लौकिक केले.त्यांना पुढील वाटचालीस  अगणिक शुभेच्छा 

शब्दांकन:निरंजन  म सोनवणे  ( अबोल अनुबंध ) हातेड खुर्द ता.चोपडा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने