खूंखार वाघाने फाडला रानडुकराचा फडशा
अकोला बाजार ,दि.२९ (प्रतिनिधी प्रवीण राठोड)यवतमाळ तालुक्यातील वडगाव पासून अवघ्या 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोरा शेत शिवारात एका नर भक्षक वाघाने एका जंगली जनावरांची शिकार केली. ही शिकार गजानन नखाते यांच्या शेतात झाल्याचे शेतकर्यांनी दिनांक 27-जुन 2022 रोजी सांगितले. त्यामुळे या परिसरात सर्व काम करणारे मजूर व शेतकरी भयभीत झाले आहे. सद्यस्थिती पाहता शेतात शेतमजूर व शेतकरी आपल्या शेतात पेरणीचे काम करतो आहे, परंतु गेल्या 15-20 दिवसापासुन धानोरा शिवारात वाघ असल्याने येथील शेतमजूर व शेतकरी आपला जीव मुठीत घेऊन काम करत आहे. तो नरभक्षक वाघ कधी व कोणाचा व कोठे घात करेल सांगता येणार नाही त्यामुळे वन विभागाने वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. आज रानडुकराचा बळी गेला उद्या एखाद्या मनुष्य बळी जाता कामा नये जर असे झाल्यास याला जबाबदार कोण अशी ओरड सध्या सुरू आहे. सदर वाघाच्या पायांचे ठस्से व घटनेचा पंचनामा वनविभागाने केला आहे.