आंबेडकरी साहित्य चळवळीचे आधारस्तंभ डॉ पानतावणे होत : जयसिंग वाघ
जळगाव दि.२९(प्रतिनिधी) आंबडकरी साहित्य चळवळ आज वैश्विक पातळीवर गेली आहे , अनेक दिग्गज लेखक , नाट्यकलावंत , कवी उदयास आले यातील बहुतेकांना डॉ गंगाधर पानतावणे यांनी दिशादर्शन केले आहे , अस्मितादर्शच्या माध्यमातून स्वतंत्र मंच उभा केला त्यामुळेच ते आंबडकरी साहित्य चळवळीचे आधारस्तंभ ठरतात असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले
सत्यशोधकी साहित्य परिषद तर्फे 28 जून रोजी डॉ गंगाधर पानतावणे यांच्या 85 व्या जयंतीनिमित्त जळगाव येथे आयोजित अभिवादन सभेत मुख्य वक्ता म्हणून जयसिंग वाघ बोलत होते
वाघ यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की डॉ पानतावणे यांनि सलग 50 वर्षे अस्मितादर्श साहित्य चळवळ चालविली , कोणताही गाईड न घेता पीएचडी मिळविली , मराठी , उर्दू , इंग्रजी , गुजराती , हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळविले , 37 साहित्य संमेलनाचे आयोजन केले त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आहे
अध्यक्षस्थानि प्रा डॉ के के अहिरे होते , प्रा डॉ सत्यजीत साळवे यांनी सुद्धा डॉ पानतावणे यांच्या कार्याची माहिती दिली
डॉ मिलिंद बागुल , डॉ सचिन पाटील , डी एम अडकमोल , युवराज माळी , मंगल पाटील , विजय लुल्हे , प्रा डॉ प्रदीप सुरवाडे , कलाशिक्षक सुनील दाभाडे , शिवराम शिरसाठ , भय्यासाहेब देवरे संगीता माळी आदींसह साहित्यिक मोठ्या संख्येने हजर होते
प्रसिद्ध कवी बापू पानपाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी डॉ पानतावणे यांचे चित्र काढले म्हणून त्यांचा शाल , बुके व पुस्तक देऊन जयसिंग वाघ व डॉ मिलिंद बागुल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला