मनापुरी,गररान येथे घरकुल न मिळाल्यास शेतकरी शेतमजूर पंचायत संघटनेतर्फे तीव्र आंदोलन !! संजीव शिरसाठ*
♦️यावल तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन..
..............................
यावल दि.३१(प्रतिनिधी): आमदार सौ लताताई सोनवणे व प्रा. चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांचे खंदे समर्थक संजीव शिरसाठ (जिल्हा सरचिटणीस शे.शे.म.पं. ) व बिराम बारेला यांच्या नेतृत्वाखाली गायरान व मनापुरी येथिल आदिवासी बाधवांचा घरकुल चा प्रश्न सुटावा यासाठी तहसिलदार पवार साहेब व गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
मौजे चुंचाळे येथिल गावरान येथे आदिवासी यांचे शेकडो घरे असुन येथे त्यांचे घरकुल मंजुर करण्यात यावेत कारण तेथे जि प शाळा, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्व काही सुरळीत असतांना आदिवासी चे घरकुल ला विरोध? तसेच मनापुरीतिल आदिवासी चे घरकुल यादी आडगाव ग्रा प ला असुन ते मानापुरी मालोद ग्रा प मध्ये आहेत.त्यांचे एकुण ३२ घरकुल असुन १२ मंजुर आहेत ४४ पैकी नाकालेले ३२ लाभार्थ्यांना गृप ग्राम पंचायत मालोद कडुन पुर्नचौकशी करुन या लाभार्थ्यांना मोलोद ग्रा प कडुन घरकुल मंजुर करण्यात यावेत.असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.लवकर न्याय न मिळाल्यास शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
यावेळी संजीव शिरसाठ,बिराम, बारेला,मालसिंग पावरा,सौ नायजाबाई पावरा,सौ नर्साबाई पावरा,सौ उमाताई बारेला,शियानी बारेला,रेखा बारेला,तितऱ्या बारेला,मकारम बारेला,अशरफ तडवी,पांडु कोळी यांच्या सह ३०० आदिवासी बंधु भगिनीं यांच्या निवेदनावर सह्या आहेत.पंचक्रोशीतील भागातील आदिवासी बंधु भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.