धम्माचे अनुशीलन जीवनाचे जीवनसत्व होय*..रुणभाई गुजराथी

 




*धम्माचे अनुशीलन जीवनाचे जीवनसत्व होय*..रुणभाई गुजराथी

चोपडा दि. ३१( प्रतिनिधी):)माणसाच्या जगण्याला सुखद आणि आनंदी करण्यासाठी तथागतांनी दिलेला धम्म हा अनुसरल्यास, त्याचे पालन केल्यास आपल्या जीवनासाठी ती जीवनसत्वच असल्याचे मत  विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी रेश्माई बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चोपडा यांच्या वतीने राजेंद्र पारे लिखित निब्बान कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले, ते पुढे म्हणाले निब्बान कादंबरीतून माणसाच्या वैश्विक रूपाला तथागत बुद्धांनी आपल्या धम्माच्या माध्यमातून अर्थ प्राप्त करून दिला असून माणसाने स्वतःला ओळखण्याची गरज या कादंबरीतून लक्षात येत असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी मत व्यक्त करताना मांडले. डॉ. मिलिंद बागूल यांनी कादंबरीचं वैशिष्ट्य विषद करताना म्हटले की, माणसांच्या मनाच्या विकारापासून त्याची मुक्ती करणे म्हणजेच निब्बान होय.त्यांनी निब्बानाच्या दिशेने वाटचाल करणारा प्रत्येक माणूस बुद्ध, ज्ञानी असून तो समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेणारा ठरत असतो, त्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांनी उपदेश करतांना मांडले की मी मुक्तिदाता नसून मार्गदाता आहे हा विचार आणि अंगीकारणारा प्रत्येक मनुष्य हा प्रकाश वाटेचा वाटसरू असून त्याची जीवन वाट समृद्ध झालेली असल्याचे स्पष्ट मत त्यांनी कादंबरीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मांडले. धर्म आणि धम्म यातला फरक विषद करीत बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा सार जीवन प्रवासाला किती सुखकर आहे हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस लेखक राजेंद्र पारे यांनी शेंदूर फासलेला कर्मकांड ,अंधश्रद्धा यातला बुद्ध अंगीकारणे म्हणजेच स्वतःची फसवणूक करून घेणे होय,ही फसगत होऊ न देता विज्ञाननिष्ठ माणसाला माणूसपण देणारी तथागत गौतम बुद्ध यांची विचारधारा अनुसरणारा व्यक्ती, समाज प्रगती साधेल हाच विचार कादंबरीतून मांडल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केले . मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.कु.शारदा बाविस्कर यांनी गायिलेल्या चांदण्याची छाया ह्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  कादंबरीचे प्रकाशन डॉ. मिलिंद बागूल यांच्या हस्ते ,अरुणभाई गुजराथी, संदीप भैय्या पाटील, विजयकुमार मौर्य,अशोक सोनवणे,नगरसेवक अशोक बाविस्कर ,रमेश शिंदे,डॉ.प्रदीप सुरवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी गुणवंत विद्यार्थी पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संदीप भैय्या पाटील,अशोक सोनवणे यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पाटील यांनी तर बक्षीस समारंभाचे संचलन संजीव शेटे यांनी केले आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी मानले मान्यवरांचे स्वागत बी. डी.शिरसाठ,सुरेखा पारे यांच्या हस्ते करण्यात आले. यशस्वितेसाठी संजय बारी ,तुषार लोहार,किरण बडगुजर, संजय सोनवणे,टी. एम.चौधरी,छोटू वारडे,दिनेश कापडणे, जितेंद्र भदाणे,प्रसाद वैद्य, भास्कर पाटील,हितेंद्र मोरे,आधार पानपाटील,भरत शिरसाठ,संजय साळुंके, संभाजी पाटील,श्रीराम पाटील, दीक्षा पारे,दीप्तेज पारे यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने