*आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत संजय गांधी निराधार योजनेचे ४३९ प्रकरणे मंजूर..कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी महिलांना धनादेश वाटप*
चोपडा दि.०२(प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना विभागात गरजवंत गरजू मासिक मानधन योजनेतील लाभार्थींचे रखडलेले प्रकरणांची चाचपणी आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती बैठकीत होऊन ४३९ प्रकरणांना न्याय देण्यात आला आहे.त्यात संजय गांधी योजनेचे १७२ तर श्रावण बाळ योजनेचे २६७ प्रकरणे मार्गी लागले आहेत.याचवेळी कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी महिलांना २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी,मा.आ.सौ लताताई चंद्रकांत सोनवणे, यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार चोपडा यांच्या दालनात तालुकास्तरीय संजय गांधी योजना समितीची बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पुढील प्रमाणे अर्ज मंजूर करणेत आले.
मा सौ लताताई चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा व तहसीलदार अनिल गावित साहेब यांचे हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी महिलांना २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आले.
१) संजय गांधी योजना १७२, २) श्रावणबाळ योजना २६७, असे एकूण ४३९ अर्ज मंजूर करण्यात आले व १)संजय गांधी योजना १०९, २)श्रावणबाळ योजना २३६, असे एकूण ३४५ अर्ज अर्ज नामंजूर करण्यात आले सदर बैठकीत एकूण ७८४ अर्जांवर कार्यवाही झाली.
संजय गांधी योजने अंतर्गत सदर तालुकास्तरीय बैठकीत तहसीलदार श्री.अनिल जे. गावित, समिती सदस्य श्री.संतोष भिवसन अहिरे, सौ.मंगलाताई कैलास पाटील, श्री.राजेंद्र हिलाल पाटील, श्री गोपाल अंबादास चौधरी, सौ.रोहिणी प्रकाश पाटील, श्री.संजीव पांडुरंग शिरसाठ, श्री.रामचंद्र नारायण देशमुख, श्री.आत्माराम कौतिक गंभीर, श्री.माणिकचंद रुपचंद महाजन, गटविकास अधिकारी पं.स. चोपडा हे उपस्थित होते. तसेच सदरचे कामकाज श्री.अव्वल कारकून श्री.ए.डी.जाधव, महसूल सहाय्यक एम.बी.दरी व आय.टी.असिस्टंट समाधान भागवत कोळी यांनी पूर्ण केले.